नागपूरची भाग्यश्री नैकेले ही नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत पास झाली आहे.
भाग्यश्री हिच्या घरची परिस्थिती खूप हालाखाची आहे. वडिलांना कायमस्वरूपी काम नाही. घर देखील भाड्याचे आहे.
दिल्ली, पुणे मुंबई येथे जाऊन क्लास लावण्याची आर्थिक परिस्थिती भाग्यश्रीच्या कुटुंबाची नव्हती. त्यामुळे भाग्यश्रीने जिद्दीने घरीच अभ्यास केला. तिथे कुठेही क्लास लावले नाही.
भाग्यश्री हिने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दोन वर्ष जाॅबसुद्धा केला. मात्र, वडिलांनी तिला काम सोडायला लावून अभ्यासवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले.
दिल्ली अथवा पुणे येथे जाऊन कोणतेही क्लासेस न करता, अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत स्वतःच्या जिद्दीवर भाग्यश्रीने युपीएससी परीक्षेत 737 रँक क्रमांक मिळवला आहे.
भाग्यश्री हिची रँक पाहाता तिची युपीएससीतून इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) मिळणार आहे.
भाग्यश्रीने IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे आणि येणाऱ्या परीक्षेत ती पुन्हा प्रयत्न करणार आहे.