Badshah : बादशाह विरोधात FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Saam TV May 01, 2025 02:45 PM

आपल्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावणारा रॅपर बादशाह (Badshah ) आता अडचणीत सापडला आहे. पंजाब पोलिसांकडे बादशाह विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बादशाहाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'velvet flow' या गाण्याने ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा आरोप बादशाहवर करण्यात आला आहे. आजवर बादशाहाने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याचा मोठा स चाहता वर्ग आहे. त्यांच्या गाण्यांची सोशल मीडियावर तर कायम चर्चा पाहायला मिळते.

'ग्लोबल ॲक्शन कमिटी'चे प्रतिनिधित्व करणाऱ्या इमॅन्युएल मसीह नावाच्या व्यक्तीने रॅपर बादशाह विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटले आहे की, 'velvet flow' गाण्यात 'चर्च' आणि 'बायबल' सारखे पवित्र शब्द आक्षेपार्ह पद्धतीने वापरले गेले आहेत. जो ख्रिश्चन अपमान आहे.

स्थानिक स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) गुरविंदर सिंग म्हणाले की, बादशाहविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

गाण्यावर बंदी घालण्याची मागणी

मंगळवारी पंजाबमधील बटाला शहरात या मुद्द्यावरून निषेधही करण्यात आला. गोरखपूर जिल्ह्यातील गुरुदासपूर भागात असलेल्या बटाला येथे अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि बादशाहच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच गाण्यावर तात्काळ बंदी घालण्याची आणि बादशाहने माफी मागण्याची मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.