India-Pakistan War : युद्धात एकट्या पाकिस्तानच नाही, अरब देशांचही मोठं नुकसान होईल, कसं ते समजून घ्या
GH News May 01, 2025 03:35 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धाच रुप धारण करु शकतो. आर्थिक संकटात असलेल्या फक्त एकट्या पाकिस्तानचं भविष्य धोक्यात नाहीय, तर अरब जगतलाही हे युद्ध नकोय. कारण यात त्यांचं सुद्धा नुकसान आहे. गाजा युद्ध आणि अमेरिका-इस्रायलचा इराणसोबत तणाव यामुळे अरब देश आधीपासूनच चिंतेत आहेत. आता पाकिस्तान पूर्णपणे युद्धात उतरला, तर या देशांच्या सुरक्षेला आव्हान निर्माण होऊ शकतं. याचं मुख्य कारण आहे, पाकिस्तान अरब देशांचा सैन्य सहकारी आहे. पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये रणनितीक संबंधांऐवजी इस्लामवर आधारित सांस्कृतीक आणि धार्मिक संबंध सुद्धा आहेत. 50 पेक्षा जास्त मुस्लिम देशांची संघटना असलेली OIC सुद्धा दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असते. इस्लामिक जगतात पाकिस्तान स्वत:ला सैन्य शक्ती असलेला देश म्हणून सादर करतो. त्यामुळे अरब देशांसोबत पाकिस्तानची सैन्य भागीदारी सुद्धा आहे.

पाकिस्तानी सैन्य जवळपास 22 अरब देशांमध्ये आहे. तिथे पाक सैन्याचे अधिकारी प्रशिक्षण आणि रणनितीक भागीदारीची भूमिका अदा करतात. इराण, येमेनमधील हुती बंडखोर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनेमुळे आखाती देशांना एक भरवशाच्या सैन्य सहकाऱ्याची गरज आहे. पाकिस्तानी सैन्य त्यांना यामध्ये मदत करतं. अरब देशांकडे जे सैन्य आहे, त्यांना मोठं युद्ध लढण्याचा किंवा दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्याचा फारसा अनुभव नाहीय. त्यामुळे हे देश इस्रायल आणि इराणकडून असलेल्या धोक्यामुळे पाकिस्तानी सैन्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहेत. इस्लामिक जगतात पाकिस्तान एकमेव अणवस्त्र संपन्न देश आहे. त्यामुळे सौदी अरेबियासारख्या देशांना पाकिस्तान रणनितीक दृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. खासकरुन अरब देशांची इराणबरोबर स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तान जास्त जवळचा वाटतो.

इराणकडून थेट धमकी

या कठीण काळात पाकिस्तान अस्थिर झालेला या देशांना परवाडणार नाहीय. कारण मध्यपूर्वेत इस्रायल विरुद्ध आवाज बुलंद होत आहे. दुसऱ्याबाजूला इराणने थेट धमकी दिलीय. अमेरिका आणि इस्रायलला हल्ल्यासाठी अरब देशांनी आपल्या क्षेत्राचा वापर करु दिला, तर इराण या देशांवरही आक्रमण करेल अशी धमकी त्यांनी दिली आहे.

म्हणून अरब देश शांततेच आवाहन करतायत

अशा स्थितीत पाकिस्तान कमजोर होण्याचा अर्थ थेट अरब देशांची सुरक्षा कमजोर होणं. पाकिस्तानी सैन्याचा नियमितपणे सौदी अरेबिया आणि UAE या देशांबरोबर युद्ध सराव चालतो. यामुळे त्यांच्या सैन्य क्षमतेमध्ये वाढ होते. इतिहासात अनेकदा पाकिस्तानी सैन्य अरब देशांसाठी कणा बनून उभं राहिलय. म्हणूनच भारतासोबत तणाव निर्माण झाल्यानंतर सौदी अरेबिया, यूएई आणि कतार सारख्या अरब देशांनी शांततेच आवाहन केलय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.