मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. नुकताच सीआयएससीई (CISCE) बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. दिविजाने ९२ टक्के गुण मिळवले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुडन्यूज सर्वांसोबत शेअर केली. सध्या दिविजावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अमृता फडणवीस यांनी नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट सर्वांना अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी दोन गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केल्या. त्यांनी या ट्वीटमध्ये असे लिहिले की, 'सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय. आमची सुकन्या दिविजा ही १०वीच्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.'