"माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
एफआरपी वाढीचे भाजपकडून पंढरपुरात पेढे वाटून स्वागतऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार्या एफ आरपीचे भाजपा किसान मोर्चाने स्वागत केले आहे. केंद्र सरकारने ऊस दराच्या एफ आरपीत प्रति टन 150 रूपयांची वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे पेढे वाटून स्वागत केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ऊसाला किमान हमीभाव प्रतिटन 3 हजार 550 रूपये इतका मिळणार आहे. सरकारने साखरेच्या खरेदी दरात वाढ करावी अशी मागणी ही हळणवर यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्या नंतरही भोर तालुक्यातील बनेश्वर येथील रस्त्याचे काम सुरू नाहीपीएमआरडीए कडून अद्याप कामाला सुरुवात नाही
टेंडर प्रोसेसिंग सुरू असल्याने विलंब
बनेश्वर येथील ७०० मीटर रस्तासाठी सुप्रिया सुळे यानी केले होते उपोषण
पीएमआरडीए कडून सुप्रिया सुळे यांना २ मे म्हणजे आजपासून कामाला सुरुवात करू असे दिले होते लेखी आश्वासन
मात्र पीएमआरडीए च्या दिरंगाईमुळे आज ही रस्त्याचे काम सुरू नाही
सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाला पीएमआरडीए ने देखील गांभीर्याने घेतले नाही का असा प्रश्न विचारला जात आहे
Beed: बीड वनपरीमंडळ अंतर्गत नागझरी जगातील डोंगराला आगबीडच्या नागझरी येथील वन विभागाच्या डोंगराला अचानक आग लागली आहे
या अचानक लागलेल्या आगीमुळे वन विभागाकडून डोंगर परिसरामध्ये छोटी मोठी झाड लावण्यात आली होती
या भीषण आगीमुळे झाडे जळून खाक झाले असून त्याचबरोबर काही वन्य प्राण्यांची यामध्ये मोठी हानी होऊ शकते अशी शंका वर्तवली जात आहे
ही आग विझवण्यासाठी गेल्या दोन तासापासून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.
ही आग विजवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी हनुमंत वायभट,दशरथ गुजर, विलास नवले, शंकर शिंदे, मधुकर नैराळे,बबन पाव्हणे, गौतम वीर,बडगे चंद्रकांत, मेटे महेश, अकबर शेख, परमेश्वर पाव्हणे, परमेश्वर नाईक,शहादेव चव्हाण, बळीराम चव्हाण,संदिप पवार, मधूकर वायभट, लक्ष्मण जाधव, बळीराम चव्हाण आहेत..
Jalgaon : जळगाव गिरणाचे चौथे आवर्तन केवळ पिण्यासाठी मागणीनुसार जिल्हाधिकारी घेणार निर्णयजळगाव जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर या मोठ्चा, १४ मध्यम आणि ०६ लघु प्रकल्पात सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त जेलसाठा शिल्लक आहे.
हतनूर आणि गिरणा प्रकल्पातून सिंचनासह पेयजलाचे तीन आवर्तन देण्यात आले आहेत. तसेच गिरणा प्रकल्पातून चार आवर्तन पेयजलाचे शिल्लक आहेत.
यापैकी फक्त गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी चौथे आवर्तन मागणीनुसार येत्या काही दिवसात लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तापमानाचा पारा कमालीचा वाढला असल्याने जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत आहे.
Latur: लातूर जिल्ह्यातील रुग्णांना जिल्हाधिकारी कार्यालयातच मिळणार मदतराज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळावं.
याकरिता, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले होते..
यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे..
यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारी मदत मिळणार आहे...
Pandharpur: पंढरपूरच्या आषाढी वारीचे लागले सगळ्यांना वेधसंत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
देहूतून १८ जूनला संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान तर आळंदीतून १९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान
दोन्ही सस्थानकडून पालख्यांचे वेळापत्रक घोषित
धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभधाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय.
नगर परिषद धाराशिव, जलसंधारण विभाग,टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीतील गाळ काढण्यात येणार आहे
.नदीतील गाळ काढल्याने भविष्यात नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
Buldhana: पाणी आडवा, पाणी जिरवा; झाडे तोडू नका, होईल नाश, विद्यार्थ्यांनी दिला संदेशखामगाव तालुक्यातील बोरी अडगाव व लोणी गुरव येथे कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प - २ अंतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची प्रभातफेरी, मशालफेरी व शिवारफेरी काढण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा ... तसेच झाडे तोडू नका होईल नाश असा संदेश या प्रभातफेरी मधून देण्यात आलाय...
Roha: रोह्यातील घरफोडी प्रकरणी 4 जणांना अटकरोहा शहरात एकाच रात्री तीन इमारतींमध्ये घरफोडीच्या सहा घटना समोर आल्या होत्या. या घटनेने पोलिसांची झोप उडाली होती. या चोरी- घरफोडी प्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही तपासत एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. यात चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाचाही समावेश आहे.
Maharashtra Weather: विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या वरराज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात
अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद
सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच! पुणे शहरच पारा ४३ अंशावर
विदर्भातील जिल्ह्यांबाबत अकोला पाठोपाठ अमरावती ४२.८, वाशिम ४२.६, वर्धा ४२.१, चंद्रपूर ४१.८, नागपूर आणि यवतमाळ ४१.६ तर बुलढाण्यात ४०.८ अंश इतक्या तापमानाची नोंद
मराठवाड्यातील बीड मध्ये ४२.९, धाराशिव ४२.६, छत्रपती संभाजीनगर ४२ तर परभणी मध्ये ४१.६ अंश तापमानाची नोंद
मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव मध्ये, जळगावात ४४ अंश तापमान
सोलापूर मध्ये ४४.१, पुणे ४३, मालेगाव मध्ये ४२.२, सातारा ४१.२ तर नाशिक मध्ये ४० अंश तापमानाची नोंद
Pune News: फुगडी खेळत, ढोल ताशाच्या गजरात जातीय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागतकेंद्र सरकार ने जातीय जनगणना केली जाणार असल्याच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी या निर्णयाच्या स्वागतार्थ जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय.
पुण्यात सुद्धा फुले वाड्यात सर्व फुले प्रेमी आणि ओबीसी रणसंग्राम तर्फे जातनिहाय जनगणना घोषणेचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून यावेळी पुरुषांनी फुगडी खेळत या निर्णयाचे स्वागत केलं.
ढोल ताशा वाजवत आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
Pune Free Show: पुण्यात महिलांसाठी फुले चित्रपटाचा मोफत शोज्या पुण्यात फुले सिनेमातील काही दृश्यांना विरोध झाला होता त्याच पुण्यात महिलांसाठी या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केला गेला.
युवाशक्ती सोशल फाउंडेशन व समीर उत्तरकर यांच्या वतीने पुण्यात महिलांसाठी फुले चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन काल १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते.
या शोच्या माध्यमातून सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार पोहोचावेत या उद्देशानेच या मोफत शोचे आयोजन केले होते असं आयोजकांकडून सांगण्यात आलं.
हा मोफत शो पाहण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला...
Ahilyanagar: अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप यांचे दुःखद निधनपुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये सुरू होते उपचार
अंतिम पार्थिव दर्शन-
दुपारी २ वा.
(भवानीनगर - निवासस्थानी, अहिल्यानगर)
अंत्यविधी -
दुपारी ४ वा.
(अमरधाम, अहिल्यानगर)
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील होते
मध्यवर्ती बँकेचा शेतकऱ्यांना दिलासा, शून्य टक्के व्याजदराने करणार वसुलीशेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचे मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आता कुठलेही व्याज न आकारता शून्य टक्के व्याजदराने पीक कर्जाची वसुली करण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलाय या संदर्भात सर्व शाखांना निर्देश देणारे पत्र पाठवण्यात आले असून शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.
चिखली तालुक्यात विनपरवानगी प्रचंड वृक्षतोड, वन विभागाचे पूर्णतः दुर्लक्षचिखली तालुक्यात अविध पणे शेकडो वर्षांपूर्वीचे शेकडो वृक्ष कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आली आहे...
ही तोडलेली झाडे चिखली शहरात एका निर्जंनस्थळी साठवून ठेवण्यात आली आहेत..
ही झाडे तोडण्यासाठी वन विभगगाची परवानगी घेणे आवश्यक असताना तिथे परवानगी न घेता असंख्य वृक्ष तोडली जात आहेत..
याची तक्रार सुद्धा वन विभागाकडे करण्यात आली आहेत मात्र वन विभागाने त्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही..
त्यामुळे पाणी कुठेतरी मूर्तंय असा संशय व्यक्त केला जात आहे..
चिखली येथील जी झाडे तोडल्या गेली त्याची वन विभागाने तातडीने चौकशी करावी तसेच ही वृक्ष तोडण्याऱ्यावर व कोणाच्या सांगनमताने तोडल्या गेली याची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे
यवतमाळ घाटंजी तालुक्यातील तिवसाळा ग्रामपंचायतीला झेंडा उतरविण्याचा विसर, राष्ट्रध्वजाचा केला अवमान1 मे महाराष्ट्र दिनी तिवसाळा ग्रामपंचायत मध्ये रात्री उशिरा पर्यत राष्ट्रध्वज उतरविला गेला नाही,त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे..
Yavatmal News: यवतमाळ पालिकेकडे थकले 30 कोटीची पाणीपट्टीयवतमाळ पालिकेच्या वतीने वापर करण्यात येणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या थकबाकी तब्बल 30 कोटी रुपये इतकी झाली असून या थकबाकीच्या वसुलीसाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक थेट पालिका कार्यालयात वसुलीसाठी धडक देत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन थकबाकी भरणा करण्याची मागणी केली आहे.
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील काम बंद आंदोलनामुळे गावगाड्यातील कामे ठप्पग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या वतीने दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील गावगाड्यातील कामे सध्या ठप्प झाली आहेत.
राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीनं गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीममहाराष्ट्रातील किल्ल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीने गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
ही संस्था महाराष्ट्रात ३२ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिन्यातील एक रविवार महाराज्यांच्या प्रत्येक गडकिल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येते..
राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून यशवंत गड, जयगड, रत्नदुर्ग, पुर्णगड, आंबोळगड, गोविंदगड, सुवर्णदुर्ग, किल्ले सिंधुदूर्ग अशा विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती.
मोहीमेसाठी जयगड, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, लांजा, सांगली, गोवा, सावंतवाडी येथून परिवाराचे सदस्य दाखल झाले होते.
Badlapur: बदलापूर शेकडो चिमुकल्यांनी गायलं महाराष्ट्र गीतबदलापूरात महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून 1200 चिमुकल्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला,
यावेळी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने छावा चित्रपटाचा खुला शो ही आयोजित केला होता,
छत्रपती संभाजी महाराजकी जय अशा घोषणा देत छत्रपती संभाजी राजांची छावा चित्रपटातील शौर्यगाथा या चिमुकल्यांनी अनुभवली,
सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं
या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,
तसेच चिमुकल्यांसाठी पुढील सात दिवस उन्हाळी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं असून त्यात जुन्या काळातील खेळ, चित्रकला, वृक्षारोपण, मैदानी खेळ, योगा, नृत्य नृत्यकला चिमुकल्यांना शिकवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक वरूण म्हात्रे यांनी दिली.
शीळींब गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात साजरामावळच्या शिळींब गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा करण्यात आले...
लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
दरम्यान यावेळी संपूर्ण गावातून कळस मिरवणूक, काढण्यात आली या कळस मिरवणुकीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
काल्याच कीर्तनाची सेवा ह भ प. शिवा महाराज बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आली आहे. किर्तन ऐकण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतून भाविक आले होते.
महाप्रसादांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.....