'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्याला जमावाने मारले ठार; पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी निलंबित, 20 जणांना अटक
esakal May 02, 2025 04:45 PM

मंगळूर : मंगळूरच्या कुडुप्पू गावातील भत्रा कल्लुर्ती मंदिराजवळ (Bhatra Kallurti Temple) घडलेल्या ‘मॉब लिंचिंग’प्रकरणी (Mob lynching Case) चौकशीत विलंब केल्याबद्दल तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. मंगळूर ग्रामीण (Mangalore Rural Police) निरीक्षक शिवकुमार, हेड कॉन्स्टेबल चंद्रा पी. आणि कॉन्स्टेबल एल्लालिंगा यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली.

२७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान प्रक्षोभक घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीवर काही लोकांच्या गटाने हल्ला केला. त्यात तो मृत पावला. नंतर त्याची ओळख अशरफ म्हणून झाली. जो केरळमधील वायनाड जिल्ह्यातील रहिवासी होता.

प्राथमिक तपासाचा हवाला देत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित व्यक्तीजवळ एक पिशवी सापडली. शेतातून जात असताना त्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यानंतर काही व्यक्तींच्या गटाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. लाथा मारत आणि वारंवार मारहाण करण्यात आली. उपस्थितांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो मरण पावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.