पिंपरी, ता. २ : समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्षपदी मानसी चिटणीस आणि कार्यवाहपदी जयश्री श्रीखंडे यांची नियुक्ती झाली आहे.
परिषेदेचे प्रदेश कार्यकारिणी सहकार्यवाह आणि पिंपरी-चिंचवड शाखेचे निमंत्रक सुहास घुमरे यांनी मे २०२५ ते एप्रिल २०२७ या कालावधीसाठी पिंपरी-चिंचवड शाखेची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये चिटणीस, श्रीखंडे यांच्यासह सहकार्यवाह नीलेश शेंबेकर व हेमंत जोशी; कोषाध्यक्ष राजेंद्र भागवत, सदस्य उज्ज्वला केळकर, समृद्धी सुर्वे, सुरेश जोशी, श्रद्धा चटप, पुष्कर भातखंडे, हरिष मोरे, सुहास देशपांडे, स्वाती भोसले, स्नेहा पाठक, सौरभ शिंदे; सल्लागार पंजाबराव मोंढे, मीना पोकर्णा, मंगला पाटसकर, कैलास भैरट आणि मार्गदर्शक शोभा जोशी व बाळासाहेब सुबंध यांचा समावेश आहे.
---