पिंपरी, ता. २ : वीरशैव लिंगायत समाज आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे निगडीतील महात्मा बसवेश्वर उद्यानात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव आयोजित केला होता. त्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लिंगायत समाजातील व्यक्तींना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यामध्ये एस. बी. पाटील (बांधकाम व्यावसायिक), मनोहर दिवाण (सामाजिक), डॉ. अशोक नगरकर (शास्त्रज्ञ), डॉ. स्वाती महाळंक (पत्रकारिता), अवधूत भागानगरे (क्रीडा) यांचा समावेश होता. चंद्रशेखर दलाल, बसवराज कुल्लोळी, सुरेश वाळके, डॉ. विनीता लिंगायत, रमाकांत अडके यांनाही सन्मानित केले.
माजी नगरसेविका सुमन पवळे, बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवाडे, महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी यावेळी उपस्थित होते. राजाराम सावंत यांनी परिचय करून दिला. दत्तात्रय बहिरवाडे, अण्णाराय बिरादार, गुरुराज चरंतीमठ, बसवराज साखरे यांनी संयोजन केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी साखरे यांनी आभार मानले.