पणजीः गोव्याच्या शिवगार येथे आयोजित श्री लैराई जत्रोत्सवामध्ये शुक्रवारी रात्री चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर साधारण ७० जण जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि म्हापसा येथील गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच त्यांनी बिचोलिम रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. चेंगराचेंगरीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.