अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वक्तव्यावरुन नेहमी चर्चेत असतात. ट्रम्प यांच्या ट्रॅरिफची भीती जगभराने घेतली आहे. नुकतेच व्हेटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यामुळे नवीन पोप कोण होणार? याबद्दल संपूर्ण जगभरात चर्चा सुरु आहे. त्याचवेळी अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप यांच्या पोशाखातील फोटो एक्सवर शेअर केला आहे. हा फोटो व्हाईट हाऊसकडूनही पुन्हा शेअर केला गेला आहे. एआयने तयार केलेल्या या फोटोवरुन वादळ निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून समोर येत आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत डोनाल्ड ट्म्प एका खुर्चीवर बसले आहेत. त्यांनी पोपसारखा पोशाख परिधान केला आहे. तसेच पोप यांच्या मुद्रेत ते दिसत आहे. त्यांच्या गळ्यात एक क्रॉसही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) तयार केलेल्या या फोटोमुळे वादळ उठले आहे. सोशल मीडियावरील युजरकडून पोप फ्रान्सिस यांचा हा अवमान असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर प्रश्न विचारण्यात आला होता. पुढील पोप कोण असणार? त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मला पोप बनायचे आहे, असे हसत, हसत म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी स्वत: पोप यांच्या पोशाखातील फोटो एनआय जनरेट करुन शेअर केला आहे. सोशल मीडिया युजरकडून हा प्रकार असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहे. एका युजरने लिहिले की, मी कॅथोलिक नाही…मी ख्रिश्चन आहे. मी येशू ख्रिस्त यांच्यावर विश्वास ठेवतो. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पोप म्हणून येणे ही चांगली कल्पना नाही. ते पोप नाही…दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ट्रम्प यांनी असा फोटो पोस्ट करावा, यावर माझा विश्वास बसत नाही.
पोप फ्रान्सिस यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. पोप यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते. पोप यांच्या निधनानंतर व्हॅटिकन सिटीमध्ये एक चिमणी लावण्यात आली. ही चिमणी म्हणजे नवीन पोप निवडण्याच्या प्रक्रियेची सुरुवात दर्शवते.