Sangli Viral News: शिराळा तालुक्यातील खुजगावजवळील वारणा जलसेतू परिसरात चिंचोलीचे अशोक जाधव यांनी मोराचे अद्भुत नृत्य कॅमेऱ्यात टिपले. निसर्गाच्या सानिध्यातले हे दुर्लभ क्षण आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत. संपूर्ण पिसारा फुलवत बेहोषपणे जवळपास २० मिनिटे मोराचा सुंदर नृत्याविष्कार सुरू होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
पिसाऱ्याकडे पाहताना देवाने त्याच्यावर जणू पाचू-माणकांची खैरात केल्यासारखे वाटते. त्याच्या डोक्यावरील तुरा म्हणजे जणू राजमुकुटच! त्यामुळे मोर समस्त पक्षी जातीचा राजाच वाटतो. लांडोरींना आकर्षित करण्यासाठी मोर मनमोहून टाकणारे प्रेमनृत्य साधारणपणे विणीच्या हंगामात करताना आढळतात.
उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सीमारेषेवर पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ होतो. त्यामुळे मोरांचे असे नृत्य आपणाला या काळात पहायला मिळते. मोराचे हे नृत्य फक्त एक शारीरिक हालचाल नाही, तर ती एक प्रकारची कला आणि प्रेम व्यक्त करण्याची त्यांची अनोखी पद्धत आहे. या नाचाद्वारे केकी आपली ताकद आणि सौंदर्य दाखवत लांडोरींना मिलनासाठी आकर्षित करत असतो. असे पक्षी अभ्यासक सांगतात.
हा (Video) सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून अन्य माध्यमांवरही असे अनेक व्हिडिओ लोकांच्या पसंतील आलेले आहेत. पण या व्हिडिओला नागरिकांनी मोठी पसंतील दिलेली असून अन्य माध्यमांवरही शेअर केलेला आहे हा व्हिडिओ.
टीप: सांगलीमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.