ऐश्वर्या रायने विराट कोहलीबाबत सांगितली मन की बात!
GH News May 03, 2025 09:09 PM

भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहलीचा चाहता वर्ग मोठा आहे. विराट कोहलीची इलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत असते. त्याच्या खेळीची बॉलिवूड सिनेतारकांनाही भूरळ घातली आहे. बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन ही देखील विराट कोहलीची चाहती आहे. एका मुलाखतीत ऐश्वर्या रायने विराट कोहलीबाबत आपलं रोखठोक मत मांडलं. विराटची आक्रमकता खूप आवडत असल्याचं ऐश्वर्या राय बच्चन हीने सांगितलं. @ImTanujSingh नावाच्या एका चाहत्याने ऐश्वर्या राय काय म्हणाली हे याबाबत सांगितलं की, ‘मला विराट कोहलीची आक्रमकता आवडते. त्याच्या आत एक वेडेपणा आहे, जो त्याच्या खेळाच्या आवडीला पुढच्या पातळीवर घेऊन जातो. तो त्याच्या खेळावर तसेच इतर सर्व गोष्टींवर खूप लक्ष केंद्रित करतो.’ हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि कोहलीचे चाहते ते खूप शेअर करत आहेत.

51 वर्षीय ऐश्वर्या रायने विराट हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान म्हटले आहे. ऐश्वर्या रायने सांगितलं की, विराट कोहलीने ज्या पद्धतीने त्याच्या खेळाप्रती आणि तंदुरुस्तीप्रती समर्पण दाखवले आहे ते कौतुकास्पद आहे. ऐश्वर्याचा असा विश्वास आहे की, खेळाडूसाठी फक्त तांत्रिकदृष्ट्या मजबूत असणे पुरेसे नाही. त्याच्याकडे आवड आणि रागाचे योग्य संतुलन असले पाहिजे जे विराट कोहलीमध्ये आहे. ऐश्वर्या रायचा हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही. पण हा व्हिडिओ बारकाईने पाहिला तर त्याच्यासोबत चियान विक्रम देखील दिसतो. यावरून असा अंदाज लावता येतो की हा व्हिडिओ 2023 चा असावा. जेव्हा ऐश्वर्या आणि विक्रमचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दुसरीकडे, विराट कोहलीने अवनीत कौरच्या एका बोल्ड फोटोला लाईक केल्यानंतर इंस्टाग्रामवर ट्रेंड झाला होता. यानंतर विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले. माझा फीड साफ करताना अल्गोरिथम एररमुळे फोटो लाईक झाला असावा. यामागे कोणताही हेतू नव्हता. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काहीही गृहीत धरू नका. तुमच्या समजुतीबद्दल धन्यवाद,” विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिले. दरम्यान विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 63.29 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. यात त्याने सहा अर्धशतकं ठोकली आहेत. आतापर्यंतच्या दहा सामन्यात नाबाद 73 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.