एक महिला देतेय तिचा अर्धा बेड भाड्याने, शेजारी कोणीही झोपू शकतं, फक्त अट एकच
GH News May 03, 2025 09:09 PM

दरवर्षी भारतातील अनेक लोक परदेशात स्थायिक होतात. काही अमेरिकेत जातात तर काही युरोपला. पंजाब आणि हरियाणामधील बहुतेक लोक कॅनडाला जातात. तसेच ऑस्ट्रेलियालाही जातात. तिथे जाऊन आपलं वेगळं असं अस्तित्व,ओळख निर्माण करतात.अशीच एक मॉडेल आहे जिने तिचे खर्च भागवण्यासाठी विचित्र पर्याय शोधला आहे. जो आता तिचा व्यवसायही आहे. पण तिने शोधलेला मार्ग हा विचित्र असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 बेडचा अर्धा भाग खूपच कमी किमतीत भाड्याने देते 

या महिलेनं चक्क तिच्या बेडचा अर्धा भाग खूपच कमी किमतीत भाड्याने देण्यास सुरुवात केली. होय, या महिलेचं नाव मोनिक जेरेमियाह असून ती 37 वर्षांची आहे. ही महिला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहते. तिने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान तिला पैशांची तीव्र टंचाई भासत होती. तसेच, त्याच काळात तिचे ब्रेकअपही झाले. अशा परिस्थितीत तिने पैसे कमवण्याचा एक नवीन मार्ग शोधला. त्या महिलेने तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी तिने ऑनलाइन पोस्टही केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक लोकांनी बेड भाड्याने घेण्यासाठी तिच्याशी संपर्कही साधला. मोनिकने तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने देऊन चांगले पैसे कमावले आहेत.

‘हॉट बेडिंग’ पर्यायाने महिन्याला कमावतेय  50,000

मोनिक चक्क या मार्गाने महिन्याला 50,000 रुपयांपर्यंत कमावतेय. या महिलेने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान तिच्या कमाईचे सर्व मार्ग अचानक बंद झाले. अशा परिस्थितीत, तिला तिची महागडी जीवनशैली परवडणारी नव्हती. तिचे ब्रेकअप झाल्यामुळे ती तिच्या घरात एकटीच राहत होती. घराचे भाडेही खूप जास्त होते. अशा परिस्थितीत, तिने तिच्या बेडचा अर्धा भाग खूपच कमी किमतीत भाड्याने देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे, त्या महिलेने अनोळखी लोकांसोबत बेड शेअर करून महिन्याला पन्नास हजार रुपये कमाई करण्यास सुरुवात केली.

नियम मात्र लागू

ही व्यवस्था ‘हॉट बेडिंग’ म्हणून ओळखली जाते. यामध्ये अर्धा बेड अज्ञात लोकांना भाड्याने दिला जातो. यासाठी काही नियम देखील असतात. एकमेकांच्या संमतीने मिठी मारू शकतो. पण दुसरी व्यक्ती त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही.  किंवा स्पर्श करू शकत नाही. जेव्हा त्या महिलेने लोकांसोबत पैसे कमवण्याचा तिचा मार्ग शेअर केला तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली आणि या पर्यायाला धोकादायक म्हटलं. जर एखादा गुन्हेगार तुमच्या शेजारी झोपला तर मोठा धोकाही होऊ शकतो. या पोस्टनंतर, ‘हॉट बेडिंग’ची संकल्पना बरीच लोकप्रिय झाली. या पद्धतीने पैसे कमवण्याच्या अनेकांनी सुरुवातही केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.