IPL 2025: CSK च्या धोनीने टॉस जिंकला, पाटिदारच्या RCB संघातून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच बाहेर; पाहा प्लेइंग-११
esakal May 04, 2025 01:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शनिवारी सामना होत आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच बंगळुरू संघात मात्र एक बदल झाला असून त्यांनी जोश हेजलवूडच्या जागेवर लुंगी एनगीडीला संधी दिली आहे. हेजलवूड यंदाच्या हंगामात बंगळुरूचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने १० सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत.

प्लेइंग इलेव्हन -

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल

चेन्नई सुपर किंग्स: शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, दीपक हुडा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथीशा पाथिराना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.