PSI Arjun: महाराष्ट्रात राडा घालायला येतोय 'पी.एस.आय. अर्जुन; मराठीतल्या डॅशिंग हिरोच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Saam TV May 04, 2025 02:45 AM

PSI Arjun Marathi Movie: बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

नुकताच '' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून ला जेलमध्ये घेऊन आले. अंकुशची ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली. तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले. मराठीत इतक्या भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुदा पहिला ट्रेलर लाँच सोहळा असावा. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्ये असल्याचे दिसतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.