गेवराई : गाझा शहरातील नागरिकांना मदत करायची असे म्हणत बीडच्या गेवराई शहरातील एकाने स्वतःचा क्यु आर कोड वापरून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख छोटूमिया कुरेशी रा.राजगल्ली(गेवराई)जि.बीड असे फसवणूक करणा-याचे नाव आहे.हिमायत फाऊंडेशन या एनजीओला बाहेर देशातील उद्देशका करिंताचे अधिकार नसताना सोशल मिडिया व्दारे गेवराई शहरातील शाहरूख कुरेशी याने याने गेवराई शहरातील नागरिकांचा विश्वास संपादन करत गाझा देशातील नागरिकांना आपण मदत करू या उद्देशाने सोशल मिडियावर अवाहन केले.
तसेच फाऊंडेशन च्या बॅक खात्यावर देणगी न घेता आपल्या आर्थिक फायद्यासाठी कुरेशी याने स्वतःच्या बॅक खात्यांचा क्यु आर कोड व्दारे निधी जमा करून लाखोंची माया जमवत नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस झाले.
दहशतवाद विरोधी (एटीस)पथकाचे पोलीस हवालदार मोहम्मद मोहसीन मोहम्मद जमीर शेख यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात आरोपी शाहरुख कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण कुमार बागंर करत आहेत.