साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 मे 2025 ते शनिवार 10 मे 2025
Marathi May 04, 2025 10:26 AM

>> नीलिमा प्राचार्य

जाळीदार प्रवासात काळजी घ्या

स्वराशीत बुध, चंद्रöशुक्र प्रतियुती. भावनेच्या आहारी गेल्यास निर्णय चुकण्याची शक्यता. साडेसातीचे पर्व सुरू आहे. मनःस्वास्थ्य विचलित होईल. प्रवासात काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत काम वाढेल, पण प्रभाव सिद्ध कराल. धंद्यात आळस नको. स्पष्टता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेक व्यक्ती तुमच्या कार्याने प्रेरित होतील. चांगला दिवस 6, 7

वृषभ – तडजोड करावी लागेल

वृषभेच्या व्ययेषात बुध, चंद्र-शुक्र प्रतियुती. महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नम्रता व सौजन्याने अनेक कामे होतील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीकडे लक्ष द्या. धंद्यात तत्परता ठेवा. वसुली करा. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तटस्थ भूमिका ठेवा. चांगला दिवस 4.5

मिथुन – आळस नको

मिथुनेच्या एकादशात बुध,सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस प्रयत्न केल्यास यश देणारा ठरेल. आळस नको. नोकरीत कामाचे कौतुक. मोठे आश्वासन मिळेल. धंद्यात लाभ-वाढ-वसुली शक्य. अनाठायी खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेक कोडी उलगडतील. ज्ञानात भर पडेल. थोरामोठय़ांचा सहवास प्रेरणादायी वाटेल. चांगला दिवस 4, 7

कर्करोग कार्याचा विस्तार शक्य

कर्केच्या दशमेषात बुध, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. वाद न वाढवता समस्या सोडविण्यावर, मोठे यश संपादन करण्यावर भर द्या. कठीण कामे मार्गी लावता येतील. नोकरीत प्रमोशन. परदेशगमनाची संधी. धंद्यातील गुंता सोडवाल. लाभ, मोठे कंत्राट, वसुली शक्य. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कार्याचा विस्तार करून तुमचे महत्त्व वाढविता येईल. लोकप्रियतेत भर पडेल. चांगला दिवस 6, 7

सिंह – प्रवासात सावध रहा

सिंहेच्या भाग्येषात बुध, बुध-गुरू लाभयोग. किरकोळ कारणाने क्रोधित होऊ नका. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. प्रवासात सावध रहा. खाण्याची काळजी घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांना मदत कराल. सहकारी मित्र गुप्त कारवाया करतील. धंद्यात काळस, हलगर्जीपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत गुपित उघड करू नका. चांगला दिवस 9, 10

कन्या कायदा पाळा

कन्येच्या अष्टमेषात बुध, चंद्र-शुक्र ग्रहयुती. अहंकारी भाषा कोणत्याही ठिकाणी यश देणार नाही. कायदा सर्वत्र पाळा. व्यसन, संताप नुकसान करेल. गोड बोलून कामे करून घ्या. नोकरी टिकवा. वाद वाढवू नका. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत विनाकारण टीकात्मक टिपणी होईल. अस्थिर होऊ नका. तात्पुरत्या अडचणींवर मात करा. चांगला दिवस 9, 10

तूळ – विचारपूर्वक बोला

तुळेच्या सप्तमेषात बुध-सूर्यöचंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. खाण्याची योग्य काळजी घ्या. नोकरीमध्ये चांगला बदल. कामाचे कौतुक. धंद्यात नवे काम मिळवा. लाभ वाढेल. अनाठायी खर्च टाळा. राजकीय. सामाजिक क्षेत्रांत मोठी संधी मिळेल. विचारपूर्वक बोला. स्तुतिसुमनांकडे तटस्थपणे पहा. फसू नका. कठोर बोलणे टाळा. चांगला दिवस 4, 5

वृश्चिक – नम्र

वृश्चिकेच्या षष्ठेषात बुध, सूर्य-चंद्र षडाष्टक योग. क्षेत्र कोणतेही असो, कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध रहा. कायदा पाळा. नम्र रहा. नोकरीत दगदग, तणाव, आरोप. व्यवसायात बदल करण्याची घाई करू नका. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न होतील. करार करताना कुठेही घाई नको. चांगला दिवस 4, 5

धनु – चुकीचा निर्णय टाळा

धनुच्या पंचमेषात बुध राश्यांतर. सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. रागावर ताबा ठेवल्यास कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकाल. चुकीचा निर्णय टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत प्रभाव वाढेल. कौतुक होईल. नवीन परिचयात वाढ होईल. धंद्यात लाभ-वाढ- वसुली- नवे काम. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अस्थिर, वादग्रस्त वातावरणाचा वीट येईल. चांगला दिवस 8, 9

मकर महत्त्वाची कामे होतील

मकरेच्या सुखस्थानात बुध, चंद्र-गुरू लाभयोग. महत्त्वाची कामे होतील. जुन्या ओळखीचा उपयोग करून अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करता येईल. नोकरीत दगदग असली तरी कामे होतील. कौतुक होईल. धंद्यात वाढ, पण ठोस निर्णयाचा विचार करा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेकांचे सहकार्य मिळेल, परंतु स्वतःलाच अस्थिरता जाणवेलचांगला दिवस 4, 8

कुंभ – दिग्गजांचा सहवास

कुंभेच्या पराक्रमात बुध, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. परस्परविरोधी घटनाक्रम घडेल. विरोधक मन मोकळे करण्यास संपर्क साधतील. नवीन दिग्गज व्यक्तींचा सहवास घडेल. साहित्याला नवा विषय मिळेल. नोकरीत तणाव. कामाचे कौतुक- प्रतिष्ठा. धंद्यातील समस्या समजून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत चर्चा, भेट यात यश. तुमचे मुद्दे विचारात घेतले जातील. चांगला दिवस 6, 7

मीन – प्रेरणादायक घटना

मीनेच्या धनेषात बुध, बुध-गुरू लाभयोग. अडचणीतून मार्ग काढता येईल. नव्या दिशेने तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रेरणादायक – आत्मविश्वासक घटनांमुळे प्रभावित व्हाल. नोकरीमध्ये प्रगती, कौतुक, प्रवास. धंद्यात फायदा. थकबाकी मिळवा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेक लोक संपर्कात येतील. मोठे यश मिळवाल. चांगला दिवस 4, 8

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.