22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच पाकव्याप्त काश्मीर पण हातचा जाण्याच्या शक्यतेने शरीफ सरकार घाबरले आहे. POK ही दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे. येथच पाकिस्तान सर्व दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो. त्यांची व्यवस्था करण्यात येते. येथे दारुगोळ्याचा मोठा साठा आहे. भारत आक्रमण करण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. तर दुसरीकडे पीओकेत मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे. पाक लष्कराने हॉटेल्स, पर्यटन स्थळे, मंगलकार्यालयाचा ताबा घेतला आहे. येथील सामान्य जनता पाक लष्कराविरोधात असतानाही त्यांची दमकोंडी करण्यात येत आहे.
पीओकेत नाकाबंदी
भारत कधीही हल्ला करू शकतो या भीतीने POK मध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. अनेक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी वीज गायब राहत आहे. भारतीय सैन्य घुसल्यास कोणते पूल पाडायचे, कुठे अडथळे आणायचे याची योजना तयार करण्यात आली आहे. नाकाबंदीत औषधी, धान्य पुरवठा आणि गॅस सिलेंडर कमी पडू नये याची दक्षात घेण्यात आली आहे. लोक सुद्धा या वस्तूंचा साठा करून ठेवत आहेत. हॉटेल्स, मदरसे बंद करण्यात आले आहे. लॉऊडस्पीकरवरून अजान देणे बंद करण्यात आले आहे.
1000 मदरसे बंद
प्रशासनाने या भागात अनेक सेवा बंद केल्या आहेत. त्यातच जवळपास 1000 मदरसे बंद करण्यात आले आहेत. पीओके हे दहशतवाद्यांचे नंदनवन आहे. त्यामुळे भारत याठिकाणी मोठा हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला आहे. या भागातील हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. मंगल कार्यालये बंद करण्यात आली आहे. येथे पाकिस्तान लष्कराने डेरा टाकला आहे कोणत्याही प्रकारच्या आतिषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे.
भारताकडे पीओके घेण्याची मोठी संधी
पीओकेचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पाकिस्तानने येथे अवैध कब्जा केला आहे. पाकड्यांचे कठपुतळी सरकार येथे अस्तित्वात आहे. ते नामधारीच आहे. सर्व कारभार हा इस्लामाबाद येथूनच चालतो. आता भारताकडे पीओके हाती घेण्याची मोठी संधी चालून आली आहे. पाकने ताब्यात ठेवलेला हा भूप्रदेश भारताशी पुन्हा जोडण्याची संधी आहे. या भागातील दहशतवादी तळ कायमचे उद्धवस्त करण्याची ही नामी संधी चालून आली आहे.