आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटातून कळतोय ही बाब दुर्दैवी असून याचं आम्हाला दुःख वाटतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सांगलीत शिवोत्सव 2025 या सोहळ्यात बोलताना त्यानी हे वक्तव्य केलं. काही महिन्यापूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नवीन पीढीला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम कळला ही एकप्रकारे खेदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.
Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशभरात अलर्टपहलगाम हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट देण्यात आला होता. अशातच जगभरातील भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानला साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीनंतर साई संस्थानसह पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
Pahalgam Terror Attack : ओमर अब्दुल्ला यांनी घेतली PM मोदींची भेट घेतलीजम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही बैठीक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बैठक सुरु होती. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भातील परिस्थीतसह विविध मुद्यांवर चर्चा झाली.
Vikhe Patil Meet Amit Shah : राधाकृष्ण विखे पाटील पुत्रासह अमित शहांच्या भेटीलाभाजप नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.