नाशिक: नाशिक जिल्हा बँकेच्या थकित कर्जदारांकडून उद्या काळाराम मंदिरात साकडे आंदोलन करण्यात येणार आहे. सीता नवमीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी घालणार सीतामाईला साकडे घालणार आहेत. शेतकरी संघटना कर्जमुक्ती आंदोलन समितीकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून तब्बल 56 हजार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नाशिक जिल्हा बँकेला राज्य सरकारकडून निधी देण्याची मागणी केली जात आहे.
नाशिक जिल्हा बँक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली असून जिल्हा बँकेच्या 56 हजार थकीत कर्जदारांना जमीन जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, तसेच जिल्हा बँकेला आर्थिक मदतची घोषणा देखील करण्यात आली. मात्र कोणतीही कार्यवाही अद्याप पर्यंत झाली नसल्याने शेतकरी संघटना कर्जमुक्ती समितीच्या माध्यमातून उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात सीता नवमीच्या पार्श्वभूमीवर सीतामाईला साकडे घालत आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी भगवान बोराडे यांनी सरकार घोषणा करते कृषिमंत्री स्थगिती देतात तर, जिल्हा बँकेचे प्रशासक राजीनामा देतात यामुळे जिल्हा बँक अडचणीतून बाहेर येणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नाशिक जिल्हा बँकेचे एकूण 2200 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) थकीत आहे. बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे सक्तीची कर्जवसुली केली जात असून जिल्ह्यातील 40 हजार कर्जदारांना सहकार कायद्याच्या कलम 101 अंतर्गत नोटीस बजावली. त्यापैकी 1100 कर्जदारांच्या मालमत्तेवर बँकेचे नाव लागले आहे. बँकेच्या या प्रक्रियेस शेतकरी संघटनांनी विरोध केला. सरकार कर्जमाफी देणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी बँकेने कर्जाच्या प्रकारानुसार ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) ही योजना राबवावी, त्याला शेतकरी निश्चितपणे प्रतिसाद देतील, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्हा बँकेचे 28 हजार कर्जदारांकडे एक लाखापर्यंतचे 50 टक्के कर्ज थकीत आहे. तर पाच लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेले 45 टक्के खातेदार आहेत. त्यामुळे ९३ टक्के कर्जदार हे पाच लाखांच्या आतील आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा बँक ही आरबीआय नाबार्डच्या नियमांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करुन -‘ओटीएस’ योजना लागू करणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..