‘किसमें कितना दम’: पाकिस्तानच्या अब्दालीस फक्त अग्नी-1 पुरेसे, अग्नी-5 मुळे तर पाकिस्तानची निघणार हवा
GH News May 04, 2025 12:07 PM

India-Pakistan Tension: पाकिस्तानने नुकतेच अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केली. अब्दाली जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. भारताकडे पाकिस्तानपेक्षा खूप जास्त क्षेपणास्त्र क्षमता असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे. अब्दाली क्षेपणास्त्राला उत्तर देण्याची वेळ आली तर भारताचे अग्नी-1 क्षेपणास्त्रच पुरेसे आहे. या क्षेपणास्त्रातून अण्वस्त्रही नेता येते.

अब्दाली क्षेपणास्त्राचा विकास पाकिस्तानच्या स्पेस अँड अप्पर अॅटमॉस्फीअर रिसर्च कमिशनकडून करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन जमिनीवर मारा करते. त्याच्यात पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता 150 मीटरपर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक मारा करते. या क्षेपणास्त्राची चाचणी 2002 मध्ये घेतली होती. त्यानंतर अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे अनेक घातक क्षेपणास्त्र आहेत. भारतीय क्षेपणास्त्रांची मारक क्षमताही मोठी आहे. अग्नी-1 ची रेंज 700 किमी आहे. अग्नी-2 तब्बल 2000 हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकतो. अग्नी-3 चा मारा 3000 पर्यंत होऊ शकतो. अग्नी-4 ची क्षमता 4000 किलोमीटरची आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्र 5000 किमीपर्यंत जाऊ शकतो. भारताची आयसीबीएम (इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र) अग्नी-5 पाकिस्तानच्या कोणत्याही भागांत पोहचू शकते. दुसरीकडे भारताचा सर्व भागांत पोहचू शकणारे क्षेपणास्त्र पाकिस्तानकडे नाही.

पाकिस्तानी क्षेपणास्त्राची क्षमता जास्तीत जास्त 2000 किमीची आहे. गजनवीचा टप्पा 300 किमी आहे. शाहीन-1 चा टप्पा 400 किमीपर्यंत आहे. शाहीन-2 चा टप्पा 1500-2000 किमीपर्यंत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, भारताजवळ अग्नी श्रेणीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. यामध्ये पारंपारीक आणि अण्वस्त्रेवाहून नेण्याची क्षमता आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या शाहीन 3 क्षेपणास्त्रचा टप्पा 2750 किलोमीटर आहे. परंतु या क्षेपणास्त्राचा अजून विकास झाला नाही. त्याची चाचणी झाली नाही. भारताजवळ ग्राउंड बेस्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाच आहे तर पाकिस्तानकडे चार आहे.

भारताने नेक्स्ट जनरेशन व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संरक्षण मंत्रालयाने त्याच्या खरेदीसाठी निविदा जारी केली आहे. 48 लाँचर, 48 नाईट-व्हिजन साइट्स, 85 क्षेपणास्त्रे आणि एक क्षेपणास्त्र चाचणी स्टेशन सिस्टम खरेदी करायची आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.