प्रीमियम फीचर्सचे बजेट स्मार्टफोन
esakal May 04, 2025 01:45 PM

अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com

इन्फिनिक्स नोट ५०s 5G+

कमीत कमी बजेट उत्तमोत्तम फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या तुम्ही शोधात असाल, तर नुकतेच आयटेल आणि इन्फिनिक्सने नवकोरे फाईव्ह-जी स्मार्टफोन्स लॉन्च केले आहे. अगदी प्रीमियम लूक असलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणकोणती फीचर्स दिली आहेत, त्याविषयी...

इन्फिनिक्सने नुकताच नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन इन्फिनिक्स नोट ५०s ५G+ भारतीय बाजारात सादर केला. किमान बजेटमध्ये उत्तम डिझाइन, परफॉर्मन्स देणारा हा देशातील सर्वात स्लीम १४४ हर्ट्झ कर्व्हड अमोलेड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० अल्टिमेट प्रोसेसर आणि एक्सओएस १५ आणि एआय आधारित पर्सनलायजेशन प्रणाली देण्यात आली आहे.

मीडियाटेक हायपर इंजिनच्या साह्याने ९० एफपीएसपर्यंत सपोर्ट असलेल्या गेम्समध्ये जलद गेमिंग अनुभव, अधिक वेगवान व्हिज्युअल्स आणि सुलभ मल्टिटास्किंगचा अनुभव मिळतो. ६.७८ इंचाच्या फूल एचडी प्लस कर्व्हड डिस्प्लेमध्ये डीसीआय पीथ्री कलर गॅमेट, १० बीट कलर डेप्थ आणि गोरिला ग्लासचे फीचर्स असल्याने या स्मार्टफोनची व्हिडिओ क्वालिटी चांगली मिळते. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ६४ मेगापिक्सल सोनी आयएमएक्स ६८२ कॅमेरा. दहा पट डिजिटल झूम, एआयआधारित फोटो इरेझर, ड्युअल एलइडी फ्लॅश, व्लॉगिंगसह विविध १२ मोड्समुळे फोटोग्राफीचा अनुभव घेता येतो. १३ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फीसह विविध मोड्स दिले आहेत. मरीन ड्रिफ्ट ब्लू, टायटेनियम ग्रे आणि बर्गंडी रेड या तीन रंगांत हा स्मार्टफोन २४ एप्रिलपासून बाजारात उपलब्ध झाला.

थोडक्यात फीचर्स
  • डिस्प्ले : ६.७८’’ एफएचडी+ अमोलेड १४४ हर्ट्झ डिस्प्ले

  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० अल्टिमेट प्रोसेसर

  • रॅम ः ८ जीबी

  • स्टोरेज : १२८ जीबी + २५६ जीबी

  • रिअर कॅमेरा : ६४ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा : १३ मेगापिक्सल

  • बॅटरी ः ५५०० एमएएच (४५ वॉ)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड V१५

  • रंग : मरीन ड्रिफ्ट ब्लू, टायटेनियम ग्रे आणि बर्गंडी रेड

  • किंमत : ८ जीबी + १२८ जीबी ः १४,९९९

  • ८ जीबी + २५६ जीबी ः १६,९९९

प्रत्येक स्मार्टफोन लॉन्च करताना आम्ही ग्राहकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करतो. इन्फिनिक्स नोट ५०एक्स ५जी+ या स्मार्टफोनमध्ये एक्सओएस १५ सॉफ्टवेअर दिले होते. त्यातून ग्राहकांच्या मिळालेल्या प्रतिक्रियांमधून आम्ही इन्फिनिक्स नोट ५०एस ५जी+मध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, हा विश्वास आहे.

- अनिश कपूर, सीईओ, इन्फिनिक्स इंडिया

आयटेल A९५ 5G+

आयटेलने नुकताच आयटेल ए९५ ५जी स्मार्टफोन लॉन्च केला. अगदीच किफायतशीर किंमत असली, तरी मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर, दर्जेदार डिस्प्ले, एआय असिस्टंट आयवाना आणि आस्क एआय जनरेटिव्ह हे या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आहेत. आयटेल ए९५ मध्ये १२० हर्ट्स रिफ्रेश रेटसह ६.६७ इंची एचडी प्लस डिस्प्ले, वॉटरप्रूफ आयपी ५४ रेटिंग आणि पंच-होल डायनामिक बारमुळे लूक आकर्षक झाला आहे.

पांडा ग्लास प्रोटेक्शनची सुरक्षितता असल्याने १०० दिवसांमध्ये डिस्प्लेमध्ये काही बिघाड झाल्यास मोफत रिप्लेसमेंट देण्याची गॅरंटी कंपनीने दिली आहे. २.४ गीगाहर्ट्स ड्युएलकोअर प्रोसेसर, ६४ बीट-माली जी५७ जीपीयूमुळे परफॉर्मन्सच्या दृष्टीनेही हा स्मार्टफोन किमतीच्या दृष्टीने सरस ठरतो; परंतु सध्या ॲण्ड्रॉइड १५चा ट्रेण्ड असताना आयटेलने ॲण्ड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टिमसह हा स्मार्टफोन का लॉन्च केला, हा प्रश्नच आहे. १२८ जीबीचा स्टोरेजसह ४ जीबी आणि ६ जीबी या दोन रॅम व्हेरियंटमध्ये उपलब्ध झालेल्या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे. टीव्ही किंवा एअर कंडिशनर्स यासारख्या होम अप्लायन्सेस कंट्रोल करण्यासाठी इन्फ्रारेड ब्लास्टर आहे. उच्च दर्जाच्या २के व्हिडिओ रेकॉर्डिंगसह व्लॉग मोड, स्काय इफेक्ट्स आणि ड्युअल व्हिडिओमुळे व्लॉगिंगसाठी चांगला पर्याय होऊ शकतो.

थोडक्यात फीचर्स
  • डिस्प्ले : ६.६७’’ एचडी प्लस+ डिस्प्ले १२० हर्ट्स डिस्प्ले

  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर

  • रॅम ः ४ जीबी, ६ जीबी

  • स्टोरेज : १२८ जीबी

  • रिअर कॅमेरा : ५० मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा : ८ मेगापिक्सल

  • बॅटरी ः ५००० एमएएच

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड १४

  • रंग : क्लॅक्स टिटॅनियम, शॅडो ब्लॅक आणि वेव्ह ग्रीन

  • किंमत : ६ जीबी + १२८ जीबी ः ९,५९९

  • ८ जीबी + २५६ जीबी ः ९,९९९

भारतातील ग्राहकांचा स्मार्टफोनबाबतचा कल बदलत असून, टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि अत्याधुनिक फीचर्स त्यांना हवे आहेत. ग्राहकांची ही मागणी आयटेल ए९५ स्मार्टफोनमधून पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एआय असिस्टण्ट आयवाना आणि आस्क एआय जनरेटिव्ह वैशिष्ट्यांमुळे हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, हा विश्वास आहे.

- अरिजीत तालापात्रा, सीईओ, आयटेल इंडिया

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.