भारताचा पाकिस्तानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा स्ट्राईक, नव्या निर्णयाने पाक हादरला, नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले
GH News May 04, 2025 08:09 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडून वेगवेगळे आणि कटोर निर्णय घेतले जात आहेत. भारताने 1965 साली झालेला सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर आता भारताकडून पाकिस्तानला जाणारे पाणी अडवण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे पाकिस्तानविरोधातील सर्वांत मोठा स्ट्राईक असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे.

भारताने नेमका काय निर्णय घेतलाय?

मिळालेल्या माहितीनुसार भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातील पाणी रोखले आहे. या धरणासोबतच भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणातील पाण्याचा प्रवाहदेखील रोखण्याचा विचार केला जात आहे.

पाणीवाटपावर झाला होता निर्णय

न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जम्मूमधील रामबन येथील बगलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा हायड्रो पॉवर डॅमच्या माध्यमातून भारत पाकिस्तानात सोडल्या जाणाऱ्या पाण्याबाबत किती पाणी सोडायचे किंवा किती पाणी रोखून ठेवायचे याबाबत निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच या धरणांच्या माध्यमातून पाकिस्तानला कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी रोखता येऊ शकते. धरणातून निघणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढवताही येऊ शकतो.

सिंधू जलवाटप करार काय आहे?

सिंधू जलवाटप करार हा 1960 साली झाला होता. जागतिक बँकेच्या मध्यस्थितीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा करार झाला होता. या करारानुसार सिंधू नदी तसेच या नदीच्या उपनद्यांच्या पाणीवाटपावर निर्णय घेण्यात आला होता. चिनाब नदीवर बगलिहार धरण आहे.

दरम्यान, आता भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचे पाणी रोखण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाकिस्ताना अनेक मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढू शकतो.

पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात

सिंधू जलवाटप करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. पाकिस्तानातील रिसर्च फर्म पाकिस्तान अॅग्रीकल्चर रिसर्चचे घशारीब शौकत यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये अनिश्चितता निर्माण होऊ शकते. पाकिस्तानकडे सध्यातरी कोणताही दुसरा पर्याय नाही. या जलवाटप करारात ज्या नद्यांचा समावेश आहे, त्या नद्यांचे पाणी फक्त शेतीच नव्हे तर शहरांच्या गरजा, वीजनिर्मिती यासाठीदेखील केला जातो, असे त्यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.