आयपीएल २०२५ मध्ये बंगळुरूचा संघ १८ वर्षांत प्रथमच चेपॉकवर जिंकला होता आणि शनिवारी त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नईवर २ धावांनी विजय मिळवला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ५ बाद २१३ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सला ५ बाद २११ धावांपर्यंतच पोहोचता आले.
जेकब बेथेल ( ५५) व विराट कोहलीच्या ( ६२) अर्धशतकानंतर रोमारियो शेफर्डने १४ चेंडूंत ५३ धावांचा पाऊस पाडला.
आयुष म्हात्रेने ४८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९४ धावांची खेळी केली, रवींद्र जडेजाने ७७ धावा केल्या.
महेंद्रसिंग धोनीची २०व्या षटकात यश दयालने विकेट घेऊन सामना आरसीबीच्या बाजूने पुर्णपणे झुकवला.
RCB vs CSK सामन्यात दोन्ही संघांच्या फॅन्समध्ये नेहमीच तणावाचा वातावरण पाहायला मिळाले आहे.
चेन्नईच्या लॉलिपॉपला बंगळुरूच्या चाहत्यांनी काल जेलच्या जर्सीने उत्तर दिलं. CSK वर दोन वर्षांची बंदी होती.
या सामन्यातील एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. यात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने लावलेल्या बेटची नोंद होती.
RCB जिंकल्यावर ती मुलगी तिच्या फोनमधील सर्व पुरुष बेस्ट मित्रांना ब्लॉक करेल असे लिहिले होते आणि RCB जिंकली...