Hania Amir Indian Fans: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर भारतात प्रचंड लोकप्रिय असून, तिच्या अभिनयामुळे भारतीय प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या राजकीय तणावामुळे भारतीय फॅन्सना तिचे शोज पाहण्यासाठी अडचणी येतात. या अडचणींमुळे अनेक भारतीय फॅन्स VPN वापरून तिचे शोज पाहतात. ही गोष्ट समजल्यावर हानिया आमिरने तिच्या फॅन्ससाठी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
हानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने भारतीय फॅन्सना VPN वापरून तिचे शोज पाहताना पाहून ती किती भावुक झाली आहे, हे व्यक्त केले आहे. तिने लिहिले, "माझे भारतीय फॅन्स VPN वापरून माझे शोज पाहतात, हे पाहून माझे हृदय भरून आले आहे. मी रडेन आता " तिच्या या पोस्टवर भारतीय फॅन्सनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.
ची ही भावना तिच्या भारतीय फॅन्ससाठी असलेल्या प्रेमासाठीही आहे. ती नेहमीच भारतीय गाण्यांवर नाचतानाचे व्हिडिओ शेअर करते आणि भारतीय संस्कृतीप्रती आपले प्रेम व्यक्त करते. तिच्या या वर्तनामुळे ती भारतातही तितकीच लोकप्रिय झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करतअनेक कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंटभारतात बंद केले. यामध्ये अभिनेत्री हानिया अमिरचा देखील समावेश आहे. तसेच पाकिस्तानातील अनेक टीव्ही शो आणि यूट्यूब चॅनलवर बंदी आणली आहे. म्ह्णून अनेक भारतीय हे शो पाहण्यासाठी विपीएनचा वापर करत आहेत.