(महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी)
महात्मा फुले महाविद्यालयात ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न झाला. प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी प्रास्ताविक केले. ‘आपल्या महाविद्यालय इमारत नूतनीकरणाचा दहा मजली आराखडा मंजूर झाला आहे. आता निधीची गरज आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनीही हातभार लागावा,’ असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले म्हणाले, ‘‘आपल्या महाविद्यालयात बहुजन, कामगार, कष्टकरी वर्गातील मुले शिक्षण घेतात. बरेचसे विद्यार्थी प्रतिथयश उद्योजक, शासकीय अधिकारी, उत्तम समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा महाविद्यालयास अभिमान आहे.’’ शुभम उद्योगचे बाळासाहेब वाघेरे यांनी वडील यशवंत वाघेरे यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयास ५१ हजार रुपयांचा निधी दिला. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर, उद्योजक विजयराज चौधरी, विद्यार्थी रयत मंचचे धम्मराज साळवी, न्यायाधीश रमेश उमरगे, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोज बोरसे, ज्ञानेश्वर जायभाये, इम्रान शेख, संदीप गव्हाणे आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. दत्तात्रय हिंगणे यांनी आभार मानले. उपप्राचार्य डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. मारुती केकाणे, डॉ. संगीता अहिवळे, नॅक कमिटी समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे उपस्थित होते.
(11289)
यशोगाथा विशेषांकाचे प्रकाशन
(यशस्वी संस्था)
समर्थ व विकसित भारतासाठी प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक सुशिक्षित रोजगारक्षम होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. यशस्वी संस्थेच्या यशोगाथा विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शिक्षणामुळे मनुष्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची शक्ती मिळते. तसेच रोजगारक्षम शिक्षणामुळे त्याच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे रोजगारक्षम पिढी घडवणारे शिक्षण ही काळाची गरज आहे.’’ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अरुण सांगोलकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी मालती रासकर, यशस्वी संस्थेचे मार्केटिंग विभागप्रमुख प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांनी प्रास्ताविक केले. मारुती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. गुरुकुलमच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मान केला. ग्रंथपाल पवन शर्मा, दिलीप पवार, इम्रान वानकर, उमेश गुरव, भरत ईप्पर, ज्ञानेश्वर गोफण व योगेश रांगणेकर आदी उपस्थित होते.
वार्षिक बक्षीस वितरण सोहळा
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निगडीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा झाला. प्रा. गणेश शिंदे आणि एमक्यूअर फार्मास्यूटिकल कंपनीचे वितरण विभाग प्रमुख तथा माजी विद्यार्थी प्रणव मिश्रा उपस्थित होते. सर्वोत्तम ग्रंथालय वापरकर्ते, सर्वोत्तम एनएसएस स्वयंसेवक, वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, उत्कर्ष विद्यार्थी पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कार असे पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रदान केले. सर्वोत्तम सांस्कृतिक पुरस्कार तृतीय वर्ष बी फार्मसी विभागाने पटकावला. क्रीडा स्पर्धेत चॅम्पियनशिप ट्रॉफीचे अंतिम विजेते बी फार्मसी चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ठरले. डॉक्टरेट पदवी प्राप्त प्रा. निकिता गायकवाड, प्रा. संगीता काळे, प्रा. सोमदत्त चौधरी, प्रा. देवेंद्र विसावकर, प्रा. प्रशांत पवार यांना सन्मानित केले. डॉ. स्मिता पिंपळे, डॉ. करीमुंनीसा शेख, डॉ. सोनाली निपटे, डॉ. विठ्ठल चोपडे, डॉ. अमित तापकीर, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पद्मजा कोरे, डॉ. अनुराधा मोरे, डॉ. पूनम केला, प्रा. शीतल चौधरी, प्रा. निकिता काळे यांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. रुपाली जिंतुरकर आणि प्रा. रोहित गुरव यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
(11376)