आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सव 37 धावांची विजय मिळवला आहे. पंजाबने लखनौसमोर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये विजयासाठी 237 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र लखनौला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने अशाप्रकारे हा सामना जिंकला. पंजाबचा हा या मोसमातील एकूण सातवा तर लखनौ विरुद्धचा दुसरा विजय ठरला. पंजाबने याआधी 1 एप्रिलला लखनौवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईला पछाडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.