Dattu More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे झाला बाबा, फोटो शेअर करत दाखवली बाळाची पहिली झलक
Saam TV May 05, 2025 06:45 AM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाद्वारे घराघरामध्ये पोहचलेला आणि सर्वांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेता दत्तू मोरेने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दत्तू मोरे नुकताच बाबा झाला. दत्तू मोरेने इन्स्टाग्रामवर बाळासोबतचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं त्यामुळे त्याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

अभिनेता दत्तू मोरेला पुत्ररत्न झाले. घरामध्ये चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाने दत्तू आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला आहे. दत्तूने इन्स्टाग्रामवर मुलासोबतचा शेअर करत त्याची झलक दाखवली आहे. दत्तू मोरेच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

इन्स्टाग्रामवर सुरूवातीचे दोन ते तीन फोटो बायकोसोबतचे शेअर केले आहे. हे फोटो प्रेग्नेंसी शूट दरम्यानचे आहेत. या फोटोसोबत दत्तूने आपल्या चिमुकल्या मुलाचे दोन क्युट फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दत्तू मोरे आणि त्याच्या पत्नीने एकमेकांच्या हातावर हात ठेवलेला दिसत असून त्यावर त्यांच्या बाळाचा हात अलगद ठेवलेला दिसत आहे. हा परफेक्ट फॅमिली फोटो त्याने शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दत्तूचे बोट त्याच्या लाडक्या लेकाने पकडल्याचे दिसत आहेत.

दत्तू मोरेने हे गोंडस फोटो शेअर करत त्याला खूप सुंदर कॅप्शन दिले आहे. त्याने या फोटोवर कॅप्शन देत लिहिले की, 'फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण…मी सदैव कृतज्ञ आहे.' दत्तू मोरेच्या या पोस्टवर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.