HSC Result – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल, तर लातूर खालून पहिला
Marathi May 05, 2025 02:28 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर सोमवारी करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.88 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल राहिला, तर लातूर विभागाचा खालून पहिला नंबर लागला आहे.

ऑनलाईन निकाल जाहीर करण्यापूर्वी शिक्षण विभागाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यात शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे.

कोकण अव्वल, लातूर खालून पहिले

पुणे – 91.32 टक्के
नागपूर – 90.52टक्के
संभाजीनगर – 92.24टक्के
मुंबई – 92.93टक्के
कोल्हापूर – 93.64 टक्के
अमरावती – 91.43 टक्के
नाशिक – 91.31 टक्के
लातूर – 89.46 टक्के
कोकण – 96.74 टक्के

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.