पाणी मागणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल होणार, मनपा प्रशासकांचा तुघलकी आदेश
Marathi May 05, 2025 02:28 PM

दहा ते बारा दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मनपा प्रशासनाकडे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नागरिकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याचे महंमद तुघलकी आदेश मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी काढले आहेत. या आदेशामुळे मनपाच्या नाकर्तेपणाविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दडपविण्याचा प्रयत्न होणार आहे. मनपा प्रशासकांच्या या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. वर्षभराची पाणीपट्टी घेऊनदेखील वर्षातील ४० दिवस पाणीपुरवठा होत आहे. त्यातही मनपाचे अभियंते, लाईनमन मनमानी पद्धतीने पाणी सोडत आहे. पर्यायी उपाययोजना राबविण्यास अपयश आले आहे. कंत्राटदारांपुढे नांगी टाकणाऱ्या मनपा प्रशासनाची पाणी देताना तारांबळ उडाली आहे. रात्री-अपरात्री पाणी सोडून नागरिकांवर उपकार केल्याचे दाखविले जात असल्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. शहराच्या चहुतांश भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत आहे. कधी कमी दाबाने, तर कधी कमी वेळ पाणी दिले जात असले तरी नागरिकांकडून प्रशासनाला सहकार्य केले जाते. तरीदेखील पाणी मागणाच्या सर्व सामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे महंमद तुघलकी आदेश प्रशासकांनी काढले आहेत. हे आदेश दाखवून उपअभियंते, कनिष्ठ अभियंते कर्मचारी नागरिकांना आंदोलन केले, तर गुन्हे दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे.

कायदा हातात घेऊन नका

शहरात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी लोकशाही मागनि आंदोलन करून आपला प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करावा. विनाकारण अभियंते, कर्मचारी यांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे, पाणी सोडण्याच्या कामात अडथळा आणणे, चावी घेऊन जाणे, असे प्रकार टाळावेत, मनपा प्रशासन पाणी देऊ शकत नसल्याचे अपयश नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न गुन्हे दाखल करून करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासकांच्या आदेशाचा गैरफायदा

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या आणि मनमानी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणाऱ्यांची गळचेपी करण्यासाठी आणि शिवसेनेच्या ‘लबाडोंना पाणी द्या’, या आंदोलनामुळे धास्तावलेल्या विरोधकांना साथ देण्यासाठीच हा आदेश काढला असल्याचा आरोप करण्यात येत असून, या आदेशाचा काही अधिकारी गैरफायदा घेतील, असेही बोलले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी यरून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. सिडको भागातील एका पाण्याच्या टाकीवर पाणी सोडण्याचा आग्रह धरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि पाणी सोडण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवत त्या ठिकाणच्या कंत्राटी कर्मचान्यांना परस्पर कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला, विशेष म्हणजे त्या महिला पदाधिकाऱ्याकडून पाणीपुरवठा सुरळीत होत आहे, असे लिहून आणले, तर तुम्हाला कामावर घेतो, असे संबंधित कर्मचाऱ्यांना सांगून त्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न एका अधिकाऱ्याने केल्याचा प्रकार समोर आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.