Maharashtra Board HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज 5 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत गेल्या वर्षाच्या निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.49 टक्क्यांनी कमी लागला आहे. म्हणजे यंदाच्या वर्षीचा निकाल 91.88 एवढा लागला आहे. जर 2022, 2023, 2024 चा निकाल पाहिला तर 2023 मध्ये यापेक्षा देखील निकाल कमी लागला होता.
त्यामुळे निकालाची सरासरी पाहिली तर दरवर्षी प्रामाणेच आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे कोकण विभागीय मंडळाचा सर्वाधिक निकाल असून लातूर विभागाचा निकाल कमी लागला आहे. म्हणजे सर्वात शेवटच्या क्रमांकाला म्हणजे 9 व्या क्रमांकाला लातूर विभाग आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्कांनी अधिक आहे.
कोकणचा सर्वाधिक निकाल 96.74 टक्क्यांनी लागला आहे. दुसऱ्या क्रमांकवर कोल्हापूर विभाग 93.64 टक्के, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग 92.93 टक्के, चौथ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर विभाग 92.24 टक्के, पाचव्या क्रमांकावर अमरावती विभाग 91. 43, सहाव्या क्रमांकावर पुणे विभाग 91.32 टक्के, सातव्या क्रमांकावर नाशिक विभाग 91.31 टक्के, आठव्या क्रमांकावर नागपूर विभाग 90.52 टक्के, नवव्या क्रमांकावर लातूर विभाग 89.46 टक्के…
नियमित विद्यार्थ्यांमध्ये एकून सरासरी निकाल 91.88 टक्के इतका लागला आहे. नियमित विद्यार्थी 14 लाख 27 हजार 85 नोंदनी झाले होते. त्यापैकी 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी 13 लाख 2873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 49 हजार 932 इतकी आहे. फस्टक्लासने उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या 4 लाख 7 हजार 438 इतकी आहे. द्वितिय श्रेणी म्हणजे 45 ते 59.99 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख 80 हजार 902 आणि 35 ते 44.99 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 64 हजार 701 इतकी आहे. असे 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.