'हाऊस अरेस्ट' शोमुळे अभिनेता एजाज (Ajaz Khan) खान चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशात आता एजाज खानच्या अडचणी वाढल्या आहेत. महिलेने त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे. आता एका महिलेने अभिनेता एजाज खानवर बलात्काराचा आरोप केला आहे. ही माहिती पोलीसांनी दिली आहे.
चारकोप पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय महिलेने खान विरोधात तक्रार दाखल केली आहे. एका चित्रपटात भूमिका देण्याचे आश्वासन देऊन एजाज खानने तिच्यावर बलात्कार केला आहे. आता एजाज खान विरोधात बलात्काराशी संबंधित भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
'हाऊस अरेस्ट'एजाज खान '' शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. 'हाऊस अरेस्ट' शोवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. 'हाऊस अरेस्ट' हा शो उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असे. 'हाऊस अरेस्ट' या शोचे काही अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यात महिला स्पर्धक त्यांचे कपडे काढताना दिसत होत्या तर स्पर्धक विचित्र पोझ देताना व्हिडीओत दिसत होते. त्यामुळे 'हाऊस अरेस्ट' शोचे एपिसोड डिलीट करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
'हाऊस अरेस्ट' शोमध्ये घडलेल्या प्रकाराविरोधात एजाज खान आणि उल्लू अँपचा एमडी अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात शिवसेना ठाकरे गट नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजप नेत्या चित्र वाघ यांनी देखील 'हाऊस अरेस्ट' शोवर टीका केली आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.