लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere ) तिच्या अभिनयासाठी कायम चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. सध्या अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रार्थना बेहेरेने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रार्थना बेहेरेच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे.
नुकतेच एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला दत्तक घेतलं आहे. तिच्या घरी क्युट कुत्र्याचे आगमन झाले आहे. कुत्र्याच्या पिल्लाची क्युट झलक तिने सोशल मीडियावर पोस्ट करून फोटोच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली आहे. या पोस्टला प्रार्थनाने खूपच खास कॅप्शन लिहिलं आहे. तसेच तिने आपल्या नवऱ्याला एक देखील दिले आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.
प्रार्थना बेहेरे पोस्ट"माझ्या नवीन बाळाला भेटा "REEL"
आपल्याला काय हवे आहे किंवा आपली गरज काय बरोबर कळते. कुत्रा आपल्या आयुष्यातली पोकळी नकळत भरुन काढतात.
अभिषेक (REEL) एक चांगले घर आणि सर्वोत्तम जीवन दिल्याबद्दल धन्यवाद ... मी वचन देते की, मी तुला कधीही निराश करणार नाही..."
प्रार्थना बेहेरेच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रार्थना बेहेरेने दत्तक घेतलेल्या क्युट कुत्र्याच्या पिल्लाचे नाव "REEL" असे आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रार्थनाच्या घरी या गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अलिकडेच 'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटात दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे.