Bollywood News: धर्मेंद्र हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. शोलेमधील त्याचा अभिनय चाहत्यांना फार भावला. आज देखील त्यांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दरम्यान अशातच अभिनेत्री शर्मिला टागोर हिने धर्मेंद्र यांच्या चंचल स्वभावाबाबत खुलासा केला आहे. शर्मिला टागोर या मनोज बायपेयी सोबत 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
या शोमध्ये शर्मिला टागोर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांचं खूप कौतूक केलं. त्या म्हणाल्या की, 'धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार मजेशीर होता. त्याच बरोबर शशि कपूर यांच्यासोबत सुद्धा काम करण्याचा अनुभव चांगला होता.'
पुढे बोलताना शर्मिला म्हणाल्या की, ' खूप विनोदी स्वभावाचे आहेत. तसंच ते खूप दयाळू वृत्तीचे सुद्धा आहेत. पण त्यांची एक वेगळी बाजू सुद्धा आहे. त्यांना विनोद करण्याची खुप सवय असून ते खूप अश्लिल विनोद करत असतात. अत्यंत घाण पद्धतीचे विनोद ते सेटवर मारत राहायचे. परंतु त्यांच्यासोबत काम करुन खूप मजा आली.' दरम्यान शर्मिला टागोर यांचं धर्मेंद्र यांच्याबाबतच वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
'अमर प्रेम' चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत शर्मिला टागोर यांनी काम केलं होतं. त्यानंतर दोघांची जोडी प्रचंड गाजली. परंतु शर्मिला यांनी खुलासा केला की राजेश खन्ना त्याचे आवडते अभिनेता नव्हते. संजीव कुमार हे आवडते अभिनेता होते. फरार, मौसम चित्रपटात शर्मिला यांनी संजीव कुमारसोबत काम केलं आहे.
शर्मिला टागोरविषयी बोलायचं झालं तर त्यांनी अनुपमा, सत्यकाम आणि चुपके चुपके चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलय. आणि शर्मिला यांचा वाढदिवस सुद्धा एकाच दिवशी असतो. दरम्यान 'रॉकी और रानी की प्रम कहानी' चित्रपटात धर्मेंद्र आणि शर्मिला यांची जोडी पहायला मिळणार होती. परंतु तब्येतीमुळे त्यांना चित्रपटातून हटवण्यात आलं.