आता 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत नवीन वळण पाहायला मिळणार आहे. 'इंद्रायणी' मालिका ही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत इंदू मोहितरावांनी दिलेले आव्हान स्वीकारते. "पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!" इंदू असे वचन देते. आता इंदू हे वचन कसं पूर्ण करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
, अधू आणि संपूर्ण गावाची साथ तिला कशी मिळणार? इंदूचे हे वचन मालिकेला नवं वळण देणार आहे. अशात आता मालिकेत अजून एक ट्विस्ट येणार आहे. गोपाळ इंदूवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण, दुसरीकडे अधूला देखील इंदू आवडते असे चित्र दिसत आहे. '' मालिकेत व्यंकू महाराज आणि इंद्रायणी आपल्या कीर्तनातून मोहितरावचा खरा चेहरा गावासमोर आणतात. यामुळेच मोहितराव चिडतो. त्याची इंदूवर आधीपासूनच वाईट नजर असते.
'इंद्रायणी' मालिकेत मोहितराव स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचा ठरवतो. मोहितराव इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो. तिथे गोपाळ येतो आणि इंदूला त्याच्या तावडीतून सोडवतो. गोपाळ मोहितरावला बजावून सांगतो की, "माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे." गोपाळच्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालिकेत काय घडणार? तसेच इंदू त्यावर काय उत्तर देणार? गोपाळ - इंदूचे फुलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोहितरावाचा इंदूला विरोध असल्याने तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. इंदू गावात शाळा उघडण्याचं आव्हान व्यंकू महाराज, गोपाळ, अधू आणि फँटया गँगच्या सहाय्याने कसे पूर्ण करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते.