Raid 2 Box Office Collection: 'रेड 2'नं मोडलं 'सिकंदर' अन् 'केसरी 2' चं रेकार्ड; रविवारी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Saam TV May 05, 2025 06:45 PM

Raid Box Office Collection Day 4: अजय देवगन आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रेड 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ चार दिवसांत ७०.७५ कोटींची कमाई केली आहे, यामुळे तो २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८ कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी २१.५० कोटींची कमाई केली. रविवारीची ही कमाई चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या कमाईमुळे 'रेड 2' ने 'सिकंदर' आणि 'केसरी २' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

'' हा २०१८ मध्ये आलेल्या 'रेड' या चित्रपटाची सिक्वेल आहे. या चित्रपटात ने आयकर अधिकारी अमय पटनायकची भूमिका साकारली आहे, जो आपल्या ७५व्या रेडमध्ये भ्रष्ट राजकारणी दादा मनोहर भाई (रितेश देशमुख) याच्यावर कारवाई करतो. वाणी कपूरने अजयच्या म्हणजेच अमय पटनायकच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे.

तसेच संजय दत्त, मोनी रॉय यांची मुख्य भूमिका असलेल्या भूतनी हा चित्रपट देखील १ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ४ दिवसात ३ कोटीनची कमाई केली आहे. रेड २ च्या तुलनेत या चित्रपटाची कमाई फारच कमी असली तर या रविवारी भूतानी या चित्रपटाने चांगला गल्ला केला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.