आयपीएलमधील सर्वात पहिली यशस्वी टीम अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबई इंडियन्सची 18 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात राहिली. मुंबईला पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र मुंबईने त्यानंतर दणक्यात कमबॅक करत सलग 6 सामने जिंकले. मुंबईने यासह प्लेऑफमधील आपला दावा मजूबत केला आहे. मुंबईने अशाप्रकारे 7 सामने जिंकले आहेत. मुंबई आपला पुढील सामना हा 6 मे रोजी शेजारी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी पलटणला मोठा झटका लागला आहे.
रविवारी 4 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. पंजाबने या सामन्यात लखनौवर 37 धावांनी मात केली. पंजाबचा हा सातवा विजय ठरला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली.
पंजाबला लखनौ विरूद्धच्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला. पंजाबने चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे दुसऱ्या स्थानी असलेल्या मुंबईला झटका लागला. मुंबईला एका स्थानाचं नुकसान झालं. मुंबईची तिसऱ्या तर गुजरात टायटन्सची चौथ्या स्थानी घसरण झाली.
ताज्या आकडेवारीनुसार, पंजाबने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर कोलकाताचा 1 सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाबला 1 गुण मिळाला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 15 गुण आहेत. पंजाबचा नेट रनरेट हा लखनौ विरूद्धच्या सामन्यानंतर +0.376 असा झालाय, जो या सामन्याआधी +0.20 असा होता.
पंजाब किंग्सची दुसऱ्या स्थानी झेप
दरम्यान या 18 व्या मोसमात आतापर्यंत 54 सामने झाले आहेत. मात्र त्यानंतरही प्लेऑफसाठी एकही संघ निश्चित झालेला नाही. आरसीबीचे 16 गुण असूनही ते प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत. पंजाबच्या खात्यात 15 गुण आहेत. तर मुंबई आणि गुजरातचे प्रत्येकी 14-14 गुण आहेत. तसेच चेन्नई आणि राजस्थानचा अपवदा वगळता इतर 4 संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या 4 जागांसाठी 8 संघामध्ये रस्सीखेच आहे. त्यामुळे येत्या काही सामन्यांमध्ये प्लेऑफसाठी 8 संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार, यात काडीमात्र शंका नाही.