आयपीएल 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत 55 सामन्यांचा खेळ संपला आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. पण अजूनही प्लेऑफमधील चार संघांचं काहीच निश्चित झालेलं नाही. अजूनही सात संघांमध्ये सात संघांमध्ये चार जागांसाठी चुरस आहे. त्यामुळे प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक जय पराजयाचा गुणतालिकेवर प्रभाव दिसून येणार आहे. सध्या आयपीएल गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अव्वल स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16 गुण मिळवूनही अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेलं नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इतर सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. विशेषतः चार संघांना आरसीबीला मागे टाकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याचे पुढील तीन सामने लखनौ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याशी होत आहे. जर या तीन संघांविरुद्ध पराभूत झाले तर त्यांचे 16 गुण राहतील. आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना पुढील टप्प्यात प्रवेश मिळेल. म्हणूनच आरसीबी संघासाठी पुढील सामने महत्त्वाचे आहेत.