Pawandeep Rajan: इंडियन आयडॉल विजेता पवनदीप अपघातानंतर ICU मध्ये; ऑपरेशनची तयारी सुरु
Saam TV May 06, 2025 09:45 PM

Pawandeep Rajan Accident: इंडियन आयडॉल 12 चे विजेते गायक पवनदीप राजनचा 5 मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील मुरादाबादजवळ भीषण अपघात झाला. अहमदाबादमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या पवनदीपच्या कारची एका उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात पवनदीपसह त्याचा ड्रायव्हर राहुल सिंग आणि मित्र अजय मेहरा हे तिघेही गंभीर जखमी झाले. पवनदीपच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर तिघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण पवनदीपच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्याला नोएडातील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर सायंकाळी 7 वाजता 6 तासांचे ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशननंतर त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर उर्वरित फ्रॅक्चर आणि इतर जखमांवर पुन्हा ऑपरेशन करण्यात येणार आहे.

च्या टीमने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "कालचा दिवस पवनदीपच्या कुटुंब आणि चाहत्यांसाठी अत्यंत कठीण होता. पवनदीप दिवसभर तीव्र वेदनेत होते आणि बेशुद्ध होते. संध्याकाळी 7 वाजता त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आणि 6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काही मोठ्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यात आले. सध्या तो ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर उर्वरित फ्रॅक्चर आणि जखमांवर पुन्हा शस्त्रक्रिया केली जाईल."

पवनदीप राजन यांनी जिंकून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्याच्या सुरेल आवाजाने आणि संगीताच्या कौशल्याने त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या त्याच्या प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. त्याच्या टीमने देखील सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत आणि पवनदीप लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.