पौड, ता. ६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुळशी तालुक्याचा निकाल ९७.६४ टक्के लागला. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची बाजी मारत शैक्षणिक गुणवत्तेचा अनोखा मुळशी पॅटर्न निर्माण केला. तालुक्यातील १७ शाळांमधील विविध १६ शाखांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
मुळशी तालुक्यात १४५३ मुले आणि १३९४ मुली, अशा एकूण २८४७ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात प्रत्यक्षात २८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४०६ मुले आणि १३७० मुली, असे एकूण २७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण ९६.८३; तर मुलींचे प्रमाण ९८.४९ टक्के आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या शेकडा निकालात मुळशी तालुका उत्तीर्णांमध्ये अव्वल ठरला आहे. यात ३६० विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले असून, ९१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२४९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत; तर २५० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील विविध शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे- श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड (कला १००, वाणिज्य ९६.४२, व्यवसाय विभाग १००), पिरंगुट इंग्लिश स्कूल (कला ९७.९३, वाणिज्य ९९.०१, विज्ञान १००, व्यवसाय विभाग १००), न्यू इंग्लिश स्कूल, हिंजवडी (कला १००, वाणिज्य ९३.६८), माध्यमिक विद्यालय भूगाव (वाणिज्य ९५.६५), राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, कासारआंबोली (विज्ञान १००), बालाजी ज्युनिअर कॉलेज ताथवडे (विज्ञान ९४.२१, वाणिज्य ९८.०५), मारूंजी विद्यालय (वाणिज्य ९३.२२, विज्ञान ९८.२१), संपर्क विद्यालय भांबर्डे (वाणिज्य ८५.७१), सूर्यदत्ता महाविद्यालय बावधन (कला १००, वाणिज्य ९४.२८, विज्ञान १००, व्यवसाय विभाग ९०), अनुसया ओव्हाळ विद्यालय (कला ५०, वाणिज्य १००), माध्यमिक विद्यालय उरवडे (वाणिज्य ९४.४४), चैतन्य ज्युनिअर कॉलेज नांदे (विज्ञान १००), चाणक्य ज्युनिअर कॉलेज पिरंगुट (विज्ञान- १००, वाणिज्य १००), अकेमी ज्युनिअर कॉलेज (विज्ञान १००, वाणिज्य १००), साईबालाजी विद्यालय (विज्ञान १००, वाणिज्य १००), अलार्ड महाविद्यालय (विज्ञान १००, वाणिज्य १००).