पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. कोंथिंबीर आणण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. भरधाव जेसीबीने ६ वर्षांच्या चिमुकल्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि रक्तस्राव झाल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जेसीबी चालकाला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोशी गोडाऊन चौक परिसरात ही घटना घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या एका जेसीबीने ६ वर्षीय चिमुकल्याला धडक दिली. या अपघातामध्ये ऋषिकेश जयदेव खराडेचा मृत्यू झाला. ऋषिकेशने जागीच प्राण सोडले. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
ऋषिकेशला घरच्यांनी आणण्यासाठी सांगितले होते. कोथिंबीर आणायला गेले असता त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. मृत ऋषिकेशच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल रामचंद्र जाधवच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाला अटक केली.