आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेद्वारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीची सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने रोहित शर्मा याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितसाठी हा मोठा झटका समजला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.