ज्यानं बलाढ्य देश चालवला, त्याचा ऑपरेशन सिंदूरला सपोर्ट, जगात भारी नेता काय म्हणाला? पाकिस्तान मात्र…
GH News May 08, 2025 02:07 AM

Operation Sindoor : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पिओके आणि पाकिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांच्या खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, भारताच्या या कारवाईचे जगभरातील अनेक देश समर्थ करत आहेत.

दहशतवाद्यांना शिक्षेतून सूट मिळायला नको…

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेसह अनेक देशांना या कारवाईची माहिती दिली. दरम्यान, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताच्या या ऑपरेशनचा पाठिंबा दिला आहे. अन्य देशांच्या अख्त्यारीत असलेल्या जमिनीतून दहशतवादी हल्ले होत असतील तर ते कोणताही देश सहन करणार नाही. भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले हे समर्थनीय आहे. दहशतवाद्यांना शिक्षेतून सूट मिळायला नको, असे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.

ऋषी सुनक जागतिक पटलावरचे मोठे नेते

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत. ब्रिटन हा देश जागतिक पटलावर मोठा आणि महत्त्वाचा असा देश आहे. या देशाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम इतरही देशांवर पडतात. याच ब्रिटनचे नेतृत्त्व ऋषी सुनक यांनी केलेले आहे. ते ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यांनी ब्रिटनसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळेच ऋषी सुनक यांचे जागतिक नेते म्हणून मोठे वजन आहे. याच ऋषी सुनक यांनी ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले आहे. त्यांनी भारताने केलेली कृती योग्य असल्याचे म्हटले आहे.

100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार

दरम्यान, भारताने 6-7 मेच्या रात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एकूण 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने केलेल्या कारवाईत एकूण 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. भारताने मात्र या कृतीला युद्ध छेडण्याची कृती असल्याचे म्हटले आहे. भारताने हे हल्ले केल्यानंतर आमची ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरोधात होती, असं स्पष्ट केलंय. आम्ही पाकिस्ताच्या नागरिकांवर तसेच सैनिकांवर हल्ला केलेला नाही, असे भारताने स्पष्ट केलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.