Akshhaya Hindallkar: विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली गुणी अभिनेत्री अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पी.एस.आय. अर्जुन' या चित्रपटात ती सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अंकुश एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून अक्षया यात कोणत्या भूमिकेत दिसणार, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी अक्षयाच्या चाहत्यांना ती एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार, हे नक्की !
आपल्या या भूमिकेबद्दल म्हणते, ‘’पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आजवर कधीही न साकारलेली भूमिका मी या चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटाचे स्क्रिप्ट ऐकून मी या चित्रपटाला त्वरित होणार दिला. यात इतके मातब्बर कलाकार असल्याने सुरुवातीला थोडे दडपण होते.
परंतु हे सगळे सहकलाकारला इतके कम्फर्टटेबल करतात, की आपले काम आपसूकच चांगले होते. या सगळ्यांकडून शिकण्यासारखे खूप आहे. या सगळ्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून मनात संमिश्र भावना आहेत.’’
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ''चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी 'पी. एस. आय. अर्जुन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.