पीआयबीने पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र भारताच्या पीआयबीने ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही असे पीआयबीने म्हटले आहे.
Nashik : नाशिकमध्ये मॉकड्रीलभारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक नगरी नाशिक मध्ये पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर मंदिर तसेच काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये मॉकड्रील करण्यात आले आहे. आपत्ती काळात पर्यटन स्थळी पर्यटक अडकल्यास या आपत्तीजन्य परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे? याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले आहे. दरम्यान मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
ड्रोन, क्षेपणास्त्रांनी भारतीय सीमेवर पाकिस्तानचाड्रोन, क्षेपणास्त्रांनी भारतीय सीमेवर पाकिस्तानचा हल्ला केला. या हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिले. पाकिस्तानकडून भारतीय नागरीवस्त्यांना टार्गेट करण्यात आले. पाकिस्तान लाहौरमधून होत असलेल्या नागरिक विमान उड्डानाच्या आडून हल्ला करत आहे, असे लेफ्टनंट सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
नाशिकमध्ये मंदिरांच्या सुरक्षेत वाढभारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थिच्या पार्श्वभूमीवर धार्मिक नगरी नाशिकमध्ये मंदिरांच्या सुरक्षेत वाढ भाविकांची संख्या घटली.
शेअरबाजार कोसळलाभारत पाकिस्तान तणानात शेअर बाजार कोसळला आहे. शेअरबाजारातील गुंतवणुकदारांच्या 7 लाख कोटी रुपयांची राखरांगोळी झाली. युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजाराची पडझड सुरूच आहे.
Rajkumar Thapa Death : राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीदपाकिस्तानने राजौरी येथे डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोटात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
Indian Air Force press conference : दहा वाजता भारतीय हवाईदलाची प्रेस कॉन्फरन्स सुरू होणारपाकिस्तानकडून भारतावर करण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांना भारताच्या हवाई दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता थोड्या वेळात भारतीय हवाई दलाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये आतापर्यंतच्या पाकविरोधात केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
Navi Delhi : भारतातील 32 विमानतळ तात्पुरते बंदभारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान प्राधिकरणाने 32 विमानतळ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून एअरमेनना याबाबतची सूचना जारी केली आहे. या विमान तळावरून आता कोणत्याही विमानानाला उड्डाण करता येणार नाही. हा निर्णय 14 मे 2025 पर्यंत लागू राहणार आहे.
India–Pakistan War : पाकचा जम्मू परिसरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्तपाकचा जम्मू परिसरातील दहशतवादी तळ भारताकडून उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ले सुरू असल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
एकीकडे भारत पाकिस्तानवर हवेतून हल्ले करत असतानाच आता पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढावलं आहे. कारण मध्यरात्री 1.44 मिनिटांनी पाकिस्तान भुकंपाने हादरलं आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागून हे हल्ले करत असतानाच भूंकपामुळे पाकिस्तानमध्ये भितीचं वातावरण आहे.
Pakistan drone attack : पाकिस्तानने फतेह 1 क्षेपणास्त्र दिल्लीवर डागलेपाकिस्तानने आता थेट भारताची राजधानी दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारताने परतवून लावला. हरियाणातील सिरसामध्येच पाकचे फतेह 1 क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलं. पाकिस्तानकडून जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर आणि बियास एअर बेसवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.