पुणे : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
ऑपरेशन सिंदूर बाबत मनसेचे नेते अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की भारतीय सैन्याच आम्हाला अभिमान आहे.पहलगाम हल्ल्यानंतर जेवढं दुःख मला झालं होतं तेवढं समाधान आज मला मिळत नाहीये कारण ते अतिरेकी अजूनही फिरत आहे. पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी अजूनही मोकाट फिरत आहे म्हणून मला तो आनंद मिळालेलं नाही.न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते अतिरेकी हे मारले जातील अस यावेळी अमित ठाकरे म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने देखील भारताला इशारा दिला आहे याबाबत अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की त्याच्या नऊ ठिकाणी जाऊन आपण हल्ले केले आहे आत्ता ते काय आपल्याला इशारा देतील.साहेब ज्या पद्धतीने आज सकाळी बोलले की युद्ध हे उत्तर नाही.ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला आहे त्यांना ठेचून मारलं पाहिजे. सामान्य लोकांचं का बळी घेत आहे.आपल्या सैन्याला सलाम असून त्यांना जे सांगितल जात आहे ते करत आहे.पहलगाम हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे म्हणून मला तो आनंद अजून मला मिळालेला नाही अस यावेळी अमित ठाकरे म्हणाले.
पहलगाम च्या सुरक्षेच्या बाबत अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की ते अतिरेकी आत आले कसे हे आपण विचारायला नको का त्यांनी आपल्या भारतात घुसून आपल्या लोकांना मारलं आहे.ते आलेच कसे हा प्रश्न आपण विचारल पाहिजे.हे यंत्रणेच फेल्युअर असून भारतीय सैन्याला सलाम आहे.अस यावेळी अमित ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे त्याबाबत अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की दोन भाऊ मला माहित नाही अस यावेळी अमित ठाकरे म्हणाले.