Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला अनेक सवाल विचारले आहेत. त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला आहे. जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्यावेळी मास्टरमाईंड कशा पद्धतीनं मारले याचं उदाहरणही त्यांनी सांगितलं आहे.
https://www.facebook.com/share/1BmAMk4gJW/राज ठाकरेंना पाठिंबा देणारी फेसबूक पोस्ट किरण माने यांनी केली आहे. यात ते म्हणतात, "राज ठाकरे यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. ट्विन टाॅवर्स पडले, ओसामा बिन लादेन पाकिस्तानातल्या एक घरात लपलेला शोधून मारला. कुठल्या देशातल्या निरपराध नागरिकांवर बॉम्बहल्ला केला नाही. आपल्या लष्करानंही सुरूवात छान केली आहे. आता जेव्हा पुलवामा आणि पहलगामचे नीच कृत्य करणारे नालायक अतिरेकी सापडतील आणि मारले जातील तेव्हाच आपल्या शहिदांना न्याय मिळेल.
राज ठाकरेंची भूमिका काय?राज ठाकरे म्हणाले, "युद्ध परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचं.. हे योग्य नाही. ही गोष्ट का घडली, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. पाकिस्तानला तुम्ही काय बरबाद करणार, तो आधीच बरबाद झालेला देश आहे. आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. प्रश्न असाय की, ज्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा का नव्हती? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन दहशतवाद संपणं महत्त्वाचं आहे."
ते पुढे म्हणाले, एअरस्ट्राईक करुन किंवा मॉक ड्रिल करुन लोकांना मूळ मुद्द्यावरुन भरकटवण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम हल्ला झाल्यानंतर पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर ते बिहारला कॅम्पेनला गेले. तसेच ते केरळमध्ये जाऊन अदाणींच्या पोर्टचं उद्घाटन केलं आणि मुंबईतदेखील कार्यक्रमाला हजर होते. इतकी गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या.
तुम्ही मॉक ड्रिल करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करणं गरजेचं आहे. आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जातोय, ही योग्य गोष्ट नाहीत. असं म्हणत राज ठाकरे यांनी एकप्रकार ऑपरेशन सिंदूरला फारसं महत्त्व दिलं नाही.