How to make banana bread pudding in 10 minutes: तुम्हाला सकाळी नाश्तात गोड काही खायचे असेल तर घरच्या घरी बनाना ब्रेड पुडींग तयार करू शकता. बनाना पुडींग बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. तसेच केळीमध्ये पोटॅशिअम, फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीरासाठी केळी खाणेफायदेशीर असते. तसेच तुम्ही फक्त १० मिनिटांत हा गोड आणि टेस्टी पदार्थ तयार करू शकता. बनाना पुडींग बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.
बनाना ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी लागणारे साहित्यकेळी
ब्रेड
दूध
तूप किंवा बटर
कन्डेन्स मिल्क
बनाना ब्रेड पुडिंग बनवण्याची कृतीबनाना ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी सर्वात आधी एक ब्रेड स्लाइस घ्या. त्यावर केळीचे गोल काप ठेवा. नंतर त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा आणि त्यावर केळीचे गोल काप ठेवा आणि शेवटी तिसरी ब्रेड स्लाइस ठेवा. नंतर तवा गरम करा आणि त्यावर तूप टाका आणि ब्रेड तपकीरी होईपर्यंत भाजा . नंतर दूधात कन्डेन्स मिल्क मिसळा आणि ब्रेडवर टाका. बनाना ब्रेड पुडींग तयार आहे. घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील.