दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा मदर्स डे 11 मे रोजी साजरा केला जाईल. हा दिवस खास बनवण्यासाठी तिला पुढे दिलेल्या आयडियाजपैकी एखादं छान गिफ्ट द्या.
आपल्या मनात बऱ्याच गोष्टी साठलेल्या असतात. आपण कधीच आईवर असलेलं आपलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करत नाही. मदर्स डेची संधी साधून तिला छान पत्र लिहा.
तिच्यासाठी घरातच छोटंसं आरामदायक स्पा तयार करा. बाथ सॉल्ट, सुगंधी मेणबत्त्या, तेल, हर्बल चहा, मऊ टॉवेल घ्या. शांत म्युझिक लावा आणि त्यांना छान अल्ल्हाददायक अनुभव द्या.
तुमची आणि आईची एखादी सुंदर आठवण साठवून ठेवण्यासाठी त्या फोटोची छान फ्रेम करुन ती आईला गिफ्टा करा.
तिला आवडणाऱ्या वासाची एक सुगंधी मेणबत्ती घेऊन द्या, जसं की लवेंडर, व्हॅनिला किंवा चंदन. ती लावताच घरात शांत आणि सुगंधी वातावरण तयार होईल.
तिच्या आवडीच्या कुकीज, ब्राऊनी, केक किंवा टार्ट घरी बनवा. आईला गिफ्टपेक्षा तुम्ही प्रेमाने केलेलं काहीतरी खायला मिळालं, की तीच जास्त आनंद होईल.
तुमच्या आईला झाडांची, रोपांची आवड असेल तर तिच्यासाठी खास इनडोअर प्लांट्स किंवा सक्यूलंट्स खरेदी करा, जसेकी कॅक्टस.
आईच्या नावासोबत, तुमचा एक जुना फोटो, किंवा “तूच माझं जग आहेस” असा एखादा प्रेमळ मेसेज लिहिलेला कप गिफ्ट करा.