पिंपरी, ता. ८ : पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी आयोजित बारा वर्षांखालील मुलांच्या ‘व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेचे थेरगाव येथील मैदानावर बुधवारी (ता. ७) चार साखळी सामने पार पडले. यात क्रिक नाईन अकादमीने साई शिरूर क्रिकेट अकादमीला पराभूत केले. या सामन्यात प्रिन्स कलाटे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने स्पेशल इलेव्हन क्रिकेट अकादमीला पराभूत केले. या सामन्यात कृष्णराज पाटील सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात आर्यन्स क्रिकेट अकादमीने क्रिक फिटनेट अकादमीचा पराभव केला. या सामन्यात यज्ञेश मोहिते सामनावीर ठरला. शेवटच्या सामन्यात क्रिक नाईन अकादमीने क्रिक बेसिक्स अकादमीस पराभूत केले. यात रुद्र चौगुले सामनावीर ठरला.